शेतकऱ्यांना मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:02 PM2018-07-14T22:02:12+5:302018-07-14T22:03:15+5:30

अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,....

Farmers do not help | शेतकऱ्यांना मदत नाही

शेतकऱ्यांना मदत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्ष नेत्यांचे वेधले लक्ष : राजू तिमांडे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, अशी तक्रार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली. नागपूर येथे मुंडे यांची भेट घेवून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था विषद केली.
माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले की ५ जुलैपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभी पीके करपल्या गेली आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर, सेलू तालुक्यात पावसाने सलग २५ तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.
अतिवृष्टीमुळे नांद धरणाचे ६ दरवाजे, वडगाव धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग झाल्याने नदी व नाल्याकाठच्या शेतजमिनीतील उभी पीके ४८ तासाच्यावर पाण्यात होती. त्यामुळे शेतजमिनीतील उभी पीके खरवडून गेली.
काही गावामध्ये पाणी घुसल्यामुळे घरे पडलेत.
एकुण ४५७७.२ हेक्टरचे ३३ टक्याच्या आत तर ५७६५.२२ हेक्टरचे ३३ टक्याच्या वर नुकसान झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावांना पुराचा फटका बसला असून घरांची पडझड झाली आहे. आणि पुरामध्ये जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडलेली आहे. तरी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेता सरकार कडून सर्वे करुन आर्थिक मदत देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाला याबाबतचा अहवाल पाठविला. परंतु, १० दिवसाचा कालावधी लोटूनही याबाबत शासनाने आर्थिक मदत जाहीर केली नाही. याकडे तिमांडे यांनी ना. धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले.
विधान परिषदेत मुद्दा मांडणार
अनेक शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे मिळाले नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत हिंगणघाट मतदार संघात झालेल्या नुकसानी बाबत आपण विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजू तिमांडे यांना सांगितले.

Web Title: Farmers do not help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.