पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:56 PM2018-06-23T23:56:33+5:302018-06-23T23:56:58+5:30

पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे.

Farmers and farmers due to rain rush | पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

Next
ठळक मुद्देअनेकांवर दुबार पेरणीचे संकट : ओलितासाठी विहिरीतील पाणीही आटले

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे. तर पेरणीची कामे रखडल्याने शेतमजुरांच्या हातालाही नसल्याचे घरखर्च कसा भागवावा अशी चिंता त्यांना पडली आहे.
चांगला पाऊस, लवकर पाऊस या हवामान खात्याचा अंदाजाला खो देत रोहणा परिसरात १० जूनपासून पावसाने लंबी दडी मारली. सोबत ४० अंशापेक्षा पारा अधिक तपत आहे. ८ व ९ जूनला उत्तम पाऊस आला. यंदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असे वाटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीतील ओलाव्याने पीक अंकुरली, ताशी लागली; पण त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. पेरणी केलेल्यांनी शेवटी वाचविण्यासाठी ओलित सुरू केले. विहिरीतील पाणी तुटल्यावर पुन्हा विहिरीत पाणी आलेच नाही. अनेक शेतकऱ्यांना ओलित बंद करावे लागले. काही शेतकरी फवाऱ्याच्या पंपाने पाणी देवून रोपटी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण उन्हाळ्याला लाजवेल एवढा सूर्य तापत असल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही थीटा पडत आहे. ज्यांनी पेरणी केली नव्हती त्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाच्या हवामान खात्याने २० ते २२ तारखेपर्र्यंत पाऊस येईल यावर विश्वास ठेवत पेरण्या आटोपल्या. महागडे बियाणे जमिनीतील किडे फस्त करीत आहेत तर अजूनही ६० टक्के शेतकरी पेरणी केव्हा होईल या चिंतेने काळ्या आईकडे हताश नजरेने पहात असून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबर
चिकणी (जामणी)- परिसरात गुरुवारी सायंकाळच्या पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून पऱ्हाटीची लावण व सोयाबीनची पेरणी करण्यास सज्ज झाला आहे. चिकणी व परिसरामध्ये मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लावण तथा सोयाबीनची पेरणी केली होती. तीन चार दिवस सतत पाऊस आल्यामुळे बियाणे जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरले. तर काही शेतकऱ्यांचे बिज अंकुरलेच नाही. यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ६० टक्के बीज अंकुरले आहे. आता या पावसामुळे काही शेतकऱ्यांकडून पऱ्हाटी डोबणे सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी डवरणीला प्रारंभ केला आहे; परंतु शुक्रवारपासून परत पावसाने दडी मारल्यामुळे अस्मानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्यांवपर कायम असल्याचेच दिसून येते. १२ दिवसाच्या उघाडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हाटीचे बीज दबण्याची शक्यता आहे. तर जे बीज अंकुरले त्यांना पावसाची नितांत गरज आहे. याच काळात चिकणी व परिसरामध्ये गुरुवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला तरी दुबार पेरणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येते.

Web Title: Farmers and farmers due to rain rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.