पात्र आदिवासींना डावलून शासकीय कर्मचारी, पेन्शनधारकांना घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:23 AM2018-05-21T00:23:19+5:302018-05-21T00:23:19+5:30

आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या सोरटा ग्रा. पं. मधील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ग्रा.पं. मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले होते. तर आता खऱ्या गरजुंना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे.

Due to the eligible tribals, the government employees, the pensioners, the homeowners | पात्र आदिवासींना डावलून शासकीय कर्मचारी, पेन्शनधारकांना घरकूल

पात्र आदिवासींना डावलून शासकीय कर्मचारी, पेन्शनधारकांना घरकूल

Next
ठळक मुद्देसोरटा ग्रा.पं.चा गैरप्रकार : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या सोरटा ग्रा. पं. मधील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ग्रा.पं. मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले होते. तर आता खऱ्या गरजुंना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चौदाव्या वित्त आयोगाच्या सुमारे २० लाखाचे प्रकरण ग्रा.पं. सदस्य हंसराज उर्फ रोशन मुडे यांनी उघडकीस आणून तशी तक्रारही जिल्हाधिकाºयांसह जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणी वेळोवेळी पाठपूरावा करण्यात आला; पण कुठली कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवले जात आहे. हा गैरप्रकार ताजा असतानाच आता पात्र आदिवासींना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे.
याबाबतची माहिती मिळताच एस.सी.,एस.टी शिक्षण हक्क परिषदेचे संयोजक मारोती उईके त्यांच्या सहकार्यांनी सोरटा गाठून संपूर्ण माहिती जाणून घेत योग्य कारवाई व्हावी या मागणीची तक्रार प्रकल्प संचालक व जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना केली आहे. या तक्रारीची प्रत गटविकास अधिकाºयांनाही देण्यात आली आहे. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देताना संबंधित अधिकाºयांनी खºया गरजुंना जाणीवपूर्वक डावलून शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. हा प्रकार कष्टकरी वर्ग असलेल्या आदिवासी बांधवांवर अन्याय करणाराच असल्याने त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भातील प्रत्येक पुरावा आपल्याकडे असून तो चौकशीदरम्यान आपण चौकशी अधिकाºयांसमक्ष ठेवून असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरणी तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना मारोती उईके यांच्यासह हंसराज मुडे, गोपाल घोगारी, प्रभाकर चौरे, गोपाल काळे, अशोक निकम, हरिभाऊ मांडवगडे, प्रतिक जिचकार, विजय कोहचाडे, रविंद्र थुल आदींची उपस्थिती होती.

Web Title: Due to the eligible tribals, the government employees, the pensioners, the homeowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.