डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता मनुष्याला जागविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:12 PM2019-05-31T22:12:38+5:302019-05-31T22:13:26+5:30

डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व समकालीन पत्रकारिता या विषयावर बोलताना व्यक्त केले.

Dr. Ambedkar's journalism awakens man | डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता मनुष्याला जागविणारी

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता मनुष्याला जागविणारी

Next
ठळक मुद्देसुनील खोब्रागडे : रमाई फाऊंडेशनद्वारे रमाई स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व समकालीन पत्रकारिता या विषयावर बोलताना व्यक्त केले. रमाई फाऊंडेशनद्वारा आयोजित रमाई स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. लता प्रतिभा मधुकर, माजी प्राचार्य गोरख भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. मधुकर या फुले-आंबेडकरी विचारधारा ; स्त्री मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर बोलताना म्हणाल्या, दोन हजार वर्षांपूर्वी भारतात थेरीगाथा रचणाऱ्या ७५ हजार स्त्रिया लिहित व वाचत असत. हे अद्भूतच होते. ते आपलं जगणं लिहित होत्या. पण, अशा नायिका आपल्याला कधीही न शिकविल्यामुळे हरवल्या आहेत. त्यांना शोधून पुढे आणण्याचे काम फुले-आंबेडकरी समाजाला करावे लागेल, अशा शब्दात आदरांजली अर्पण केली. यावेळी फिजिओथेरेपीस्ट डॉ. सुमित मेश्राम, गायक व संगीतकार अजय हेडाऊ व बाल कलाकार प्रणेती डंभारे यांचा रमाई स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गायक अजय हेडाऊ यांनी सुमधूर गीते गाऊन डॉ. आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. तसेच आंबेडकरी समाजातील आजचे वास्तव हे प्रणेती राजेश डंभारे या बालिकेने एकपात्री नाट्यप्रयोगातून सादर केले. प्रास्ताविक सरिता पखाले तर संचालन प्रा. ज्ञानेंद्र मुनेश्वर यांनी केले. आयोजनाकरिता प्रा. महेंद्र पखाले, दिनेश भगत, रविकांत पाटील, नयन सोनवणे, अ‍ॅड. वनिल दखणे, राजा ढाले, संदीप भगत, अशोक कांबळे, मिलिंद साखरकर, डॉ. अमोल लोहकरे, डॉ. प्रमोद कांबळे, मधु ओरके, अनिल खडतकर, अरविंद झामरे, रवींद्र जिंदे, विक्रांत भगत, मंगेश नगराळे, कुणाल भगत, आशिष धवने, चंदन पाटील, हिमांशू जोगळेकर, मिलिंद गायकवाड, शशिकांत खोब्रागडे, मकरंद जोगळेकर, विलास कांबळे, राहुल हलुले, दिनकर वासेकर, सुनील जवादे, छत्रपाल धाबर्डे, सुनील ढाले, मुकुंद नाखले, बाळू कांबळे, विकास डंभारे, भार्गवी भगत, निर्मिती पखाले, ईशा ढाले, शुभांगी भगत, माधुरी साखरकर, माया कांबळे, कल्पना ताकसांडे, अंजली कांबळे, माया राऊत, डॉ. वृंदा साखरकर व छाया खोब्रागडे यांनी सहकार्य केले.
प्रणेती डंभारेला रमाई स्मृती पुरस्कार
वर्धा- आपल्या सशक्त अभिनय आणि संवाद कौशल्याच्या माध्यमातून निर्धार हा एकपात्री प्रयोग करून सातत्याने समाजाचे प्रबोधन करणारी प्रणेती डंभारे हिला कार्याची पावती म्हणून रमाई फाऊंडेशनने सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित रमाई स्मृतिदिन २०१९ या कार्यक्रमात आणि संपादक सुनील खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखिका, हैदराबाद प्रा. डॉ. लता प्रतिभा मधुकर आणि माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई स्मृती पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला.

Web Title: Dr. Ambedkar's journalism awakens man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.