Diseases of wild animals, damaged vertical crops | वन्यप्राण्यांचा हैदोस, उभ्या पिकांचे नुकसान
वन्यप्राण्यांचा हैदोस, उभ्या पिकांचे नुकसान

ठळक मुद्देबंदोबस्त करा : तुरीची ओळच खाऊन फस्त केली

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जंगली श्वापद हे खातो कमी व उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तसेच माकड सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून कपाशीचे बोंडे, तुरीच्या शेंगा खातात. झाड मोडल्यामुळे त्या झाडांना आणारे बोंडे व शेंगा वाळून जातात. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघते की नाही हाच प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे.
जागली जाव तर सरपटणाºया प्राण्यांचा धाक, सरपटणाºया प्राण्यांमुळे बरेच शेतकरी मृत्यूमुखी पडलेत आणि तारांच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यास वन विभागाची मनाई तर आम्ही वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण कसे करावे असाही प्रश्न परिसरातील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. आहे. बरेचदा नुकसान मोठे व भरपाई कमी असा प्रकार घडतो. त्यामुळे आर्थिक संकट शेतकºयांवर येते.

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येऊ शकते. याकरिता संबंधीत विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
विजय बेलसरे, शेतकरी, जामणी (चिकणी)


Web Title: Diseases of wild animals, damaged vertical crops
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.