द. आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमात स्थापन होणार गांधी-मंडेलांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:53 PM2019-01-21T12:53:47+5:302019-01-21T12:54:22+5:30

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना करून कार्य सुरू केले होते. गांधीजी आणि डॉ. नेल्सन मंडेला यांची कर्मभूमी असल्याने जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या आश्रमात गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात येणार आहे.

D. Gandhi-Mandela statue to be set up in Tollstoy Ashram in Africa | द. आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमात स्थापन होणार गांधी-मंडेलांचा पुतळा

द. आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमात स्थापन होणार गांधी-मंडेलांचा पुतळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम/ वर्धा : महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना करून कार्य सुरू केले होते. गांधीजी आणि डॉ. नेल्सन मंडेला यांची कर्मभूमी असल्याने जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या आश्रमात गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात येणार आहे. मातीने पुतळा तयार करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जालंधरनाथ यांनी लोकमतला दिली.
गांधीजींच्या विचार व कायार्मुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला मोहनचा महात्मा दिला. खऱ्या अर्थाने बापूंना घडविण्याचे काम दक्षिण आफ्रिकेने केलेले आहे. स्वावलंबी जीवन आणि आश्रमीय जीवन पद्धतीचे धडे याच आश्रमात गिरविल्या गेले होते. सत्य, अहिंसेच्या तत्त्वावर बापूंचे जीवन असल्याने त्याच तत्त्वावर व विचारांवर डॉ. नेल्सन मंडेला यांचे कार्य राहिले आहे. तिथे भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने असून विशेषत: दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना आणि डॉ. मंडेला यांना मानणारा वर्ग मोठा आहे. गांधीजींचे जयंती महोत्सवी वर्ष तर डॉ. मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने टॉलस्टॉय फार्मचे मोहन हिरा यांच्या विचारांतून दोघा महामानवांचा पुतळा बसविण्याची कल्पना समोर आली आणि त्याला मूर्तरूप देण्याचे कामही करण्यात आल्याचे जालंधरनाथ यांनी सांगितले.
दोन्ही पुतळे फायबरमध्ये बनविल्या जाणार असून तीन बाय तीन फुटात आहे. पुतळे तयार करण्याकरिता प्रा. रवीप्रसाद सिंग व अशोक वहिवटकर यांचे सहकार्य मिळालेले आहेत असेही त्यांनी सांगितले. टॉलस्टॉय फार्म ते जोहान्सबर्ग हे ३५ किलोमीटर अंतर आहे. मा मार्गानेच बापू पायदळ जायचे. आज या मार्गाला गांधी मार्ग या नावाने ओळखल्या जात. याच मार्गावर दरवर्षी गांधी शांती वॉकचे आयोजन केले जाते. लहानापासून तर मोठ्यापर्यंत लोक यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना आदरांजली वाहतात.

जोहान्सबर्ग या ठिकाणी आता कौन्सिल हॉल आहे. सुरूवातीला तो तुरूंग होता. तिथे गांधीजी तसेच नंतर डॉ. मंडेला यांना ठेवले होते. आता त्या ठिकाणी गांधी-मंडेला संग्रहालय आहे. पुतळ्याचे काम अत्यंत बारकाईने व अभ्यासपूर्ण करावे लागले आहे. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पाठविल्या जाणार आहे.
-जालधंरनाथ, सेवाग्राम आश्रम.

Web Title: D. Gandhi-Mandela statue to be set up in Tollstoy Ashram in Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.