तहसीलदारांवरील गुन्हा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:03 PM2018-02-18T22:03:47+5:302018-02-18T22:04:02+5:30

पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला.

The crime on Tehsildars is wrong | तहसीलदारांवरील गुन्हा चुकीचा

तहसीलदारांवरील गुन्हा चुकीचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला. सदर गुन्हा चुकीचा असून तो खारीज करावा, अशी मागणी पिंपळधरीवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.
गारपिटीची माहिती सरपंच चंदा कुंडी यांनी तहसीलदार पवार यांना दिली. ते नागपूरला असल्याले नायब तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, आनंद देवकर, बी.एन. कुकडे, एकापुरे ही शासकीय चमू गावात पोहोचली व मदत कार्य सुरू झाले. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार विजय पवार यांच्यासह म्हस्के, देवकर, दुबे एकापूरे, विनोद वरकड, मंगेश आंबटकर, पंकज कावळे तथा स्वस्त धान्य दुकानदार संजय बोंदरे, टाकळे, अशोक निकम, शोभा मनवर, कहाते, सौरभ जयस्वाल, वडाळकर, केरोसीन विक्रेता उल्हास सावळकर, गॅस वितरक मयूर बुरघाटे, वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर व ग्रामस्थ मदतीला आले. शासकीय व खासगी वाहनांतून अन्नधान्य, व साहित्य पुरविले. जेवण पाण्याच्या व्यवस्थेची धावपळ सुरू असताना लक्ष्मण जांभेकर हे रास्ता रोको आंदोलनाचे आवाहन करीत होते. गरजुंना मदत प्रथम गरजेची असल्याने तहसीलदार पवार यांनी जांभेकर यांना आंदोलन करू नका, असे सांगितले; पण त्यांनी वाद घातल्याने नागरिकांनी जांभेकर यांना बाहेर काढले. प्रशासनाने मदत केली असताना वैयक्तिक आकसापोटी तहसीलदार पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा प्रकार झाला. जांभेकर यांना तहसीलदार पवार यांनी मारहाण केली नसल्याने दाखल गुन्हा खारिज करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच चंदा कुंडी, उपसरपंच नवसा राड्डी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: The crime on Tehsildars is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.