५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:27 PM2019-03-24T22:27:43+5:302019-03-24T22:28:20+5:30

जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले.

Counting of 294 gram panchayats for 574 employees | ५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

Next
ठळक मुद्देएकूण १०१ टेबल : तालुकास्थळी जाहीर होणार बहुमताचा कौल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले. रविवारी एकूण ६ हजार ६९९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारी वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या आठही तालुक्यांच्या स्थळी सकाळी १० वाजतापासून एकूण १०१ टेबलवरून मतमोजणी होणार आहे.
वर्धा तालुक्यातील ५५ ग्रा.पं.ची मतमोजणी सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात १५ टेबलवरून, सेलू तालुक्यातील ३१ ग्रा.पं.ची मतमोजणी दीपचंद चौधरी महाविद्याल सेलू येथे १० टेबलवरून, देवळी तालुक्यातील ४५ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय देवळी येथे १२ टेबलवरून, आर्वी तालुक्यातील २२ ग्रा.पं.ची मतमोजणी गांधी विद्यालय आर्वी येथे ८ टेबलवरून, आष्टी तालुक्यातील १७ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय आष्टी येथे ७ टेबलवरून, कारंजा (घा.) तालुक्यातील ३२ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय कारंजा येथे १२ टेबलवरून, हिंगणघाट तालुक्यातील ५६ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे १६ टेबलवरून आणि समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसील कार्यालय समुद्रपूर येथे २१ टेबलवरून होणार आहे. आक्षेप घेणाऱ्याला तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करावी लागणार आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. पोलीस बंदोबस्तामुळे मतमोजणी होणाऱ्या ठिकाणांना पोलीस छावणीचेच स्वरूप येणार आहे. असे असले तरी वर्धा येथे १२१, देवळी येथे १००, सेलू येथे ७०, आर्वी येथे ५५, आष्टी येथे २८, कारंजा येथे ५०, हिंगणघाट येथे ७० तर समुद्रपूर येथे ८० कर्मचाºयांच्या सहकार्याने मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
परवानगीशिवाय प्रवेश नाहीच
मतमोजणीच्या ठिकाणी कुणालाही परवानगी शिवाय जाता येणार नसून सदर परिसरात शांततेत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण व्हावी या हेतूने तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

Web Title: Counting of 294 gram panchayats for 574 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.