वर्ध्यात शहर पक्ष्याची निवडणूक; स्वातंत्र्यदिनी होणार महामतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:32 PM2018-08-14T14:32:17+5:302018-08-14T14:32:56+5:30

वर्र्धा शहरपक्षी निवडणुकीच्या प्रचारतोफा स्वातंत्र्यदिनी महामतदान अभियान राबवून थंडावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १७ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

City bird elections in Wardha on Independence day | वर्ध्यात शहर पक्ष्याची निवडणूक; स्वातंत्र्यदिनी होणार महामतदान

वर्ध्यात शहर पक्ष्याची निवडणूक; स्वातंत्र्यदिनी होणार महामतदान

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी मतमोजणी व निकालाची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्र्धा : शहरपक्षी निवडणुकीच्या प्रचारतोफा स्वातंत्र्यदिनी महामतदान अभियान राबवून थंडावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १७ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात सकाळी ७ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. त्यासाठी वर्धा नगर पालिका आणि बहार नेचर फाउंडेशनद्वारे विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे. या लोकशाही प्रकियेतही वर्धेकरांना सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
महामतदानाकरिता बुधवार, १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शिवाजी चौकासह विविध ठिकाणी नागरिकांसाठी मतदान केंद्र लावण्यात येणार आहेत. याशिवाय, रात्री १२ वाजेपर्यंत आॅनलाईन मतदान सुविधा सुरु राहणार आहे. मतदानाची शेवटची संधी नागरिकांना सदर लिंकवर प्राप्त होणार आहे. शुक्रवारी बजाज जिल्हा ग्रंथालयात सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार असून निवडणूक निरीक्षक डॉ. तारक काटे, अतुल शर्मा व डॉ.गोपाल पालीवाल यांच्या उपस्थितीत पाच फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहणार आहे. मतमोजणी पूर्ण होताच पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली वर्धा शहरपक्ष्याची अधिकृत घोषणा करतील व निकालाची प्रत नगराध्यक्ष अतुल तराळे यांना सोपवतील.

शहर पक्षी निवडणुकीमागे काय आहे उद्देश?
वर्धा शहराची ओळख ही पक्षीप्रेमी व पर्यावरण स्नेही म्हणून व्हावी तसेच येथील पक्षीजीवनाची जगाला ओळख व्हावी असा उद्देश या निवडणुकीमागे आहे. शहर पक्षी निवडण्यासाठी २०१७ मध्ये पहिली निवडणूक कोकणातील सावंतवाडी येथे घेण्यात आली होती. वर्ध्यात होणारी निवडणूक ही महाराष्ट्रातील दुसरी तर विदर्भातील पहिलीच निवडणूक असणार आहे.

Web Title: City bird elections in Wardha on Independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.