शहरातील सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:05 AM2019-01-19T00:05:46+5:302019-01-19T00:06:50+5:30

शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे.

CCTVs in the city are ineffective | शहरातील सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

शहरातील सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

Next
ठळक मुद्दे८७ लाखांचा झाला खर्च : गुन्हेगारांचा शोध घेण्यातही येतेय अपयश

भास्कर कलोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे. परिणामी, तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
बुधवार १६ जानेवारीला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील दोन ठिकाणी स्कूटरस्वार लुटारुदांपत्याने किरकोळ साहित्य घेण्यासाठी दोन हजाराची नोट देऊन मिळालेले पैसे व आपली दोन हजाराची नोट घेऊन पळ काढण्याच्या घटना घडल्या. संत तुकडोजी वाडॉतील कलोडे सभागृहासमोरील माया मनोहर ब्राह्मणवाडे यांचे किरायाच्या दुकानात या दाम्पत्याने दोन हजाराची नोट देत १०० रुपयांच्या भांड्यांची खरेदी केली. शिवाय १,९०० रुपये परत घेतले. त्यानंतर हो नाही करत दोन हजाराची नोट व १ हजार ९०० रुपये तसेच भांडी घेवून दुचाकीने यशस्वी पळ काढला. तर अर्ध्या तासाने याच दांम्पत्याने कारंजा चौकातील टिनाचे दुकानात वृद्ध महिलेला दोन हजाराची नोट देऊन ३३५ रुपयांची रंगीत फायबर शीट खरेदी करून १ हजार ७६५ रुपये परत घेतले. परंतु, साहित्य परत करण्याचा कांगावा करून दोन हजारांची नोट परत मिळविली. तसेच तेथून पळ काढला. या दोन्ही दुकादारांनी लहान रक्कम म्हणून पोलिसात तक्रार केली नाही; पण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात प्रशांत भाईमारे व सहकाऱ्यांनी गंडा घालणाºयांचा शोध सुरू केला आहे. परंतु, त्यानाही अनेक अडचणी येत आहेत.

केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमता
सदर घटनेनंतर ठगबाजांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रिकरण मिळवत ते तपासले. परंतु, केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमता असल्याने पोलिसांच्या हातीही काहीच लागले नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोण केंद्रस्थानी ठेवून जास्त स्टोअरेज क्षमतेची तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी आहे.

आमदारांच्या प्रयत्नाअंती मिळाला निधी
शहरातील छोट्या-छोट्या हालचालींकडे लक्ष ठेवत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावा या हेतूने आ. समीर कुणावर यांच्या प्रयत्नाअंती ५४ सीसीटीव्ही बसविण्यासाठी ८७ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. उशीरा का होईना मुंबईच्या एका एजंसीला कंत्राट देऊन आॅगस्ट २०१८ मध्ये कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तीन महिन्यात कामपूर्ण करण्याचा करार असताना सहा महिने होऊन सुद्धा काम पूर्ण झाले नाही. शहरात १५ ठिकाणी कॅमेरे लागले आहेत. पण एका ठिकाणचे काम शिल्लक आहे, हे विशेष.

फलक ठरतोय अडथळा
शहरातील कारंजा चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आला आहे. परंतु, नगरपालिकेच्यावतीने लावण्यात आलेल्या स्वच्छच्या जनजागृतीच्या फलकामुळे सीसीटीव्हीच्या कॅमेरे झाकोळले गेले आहेत. यामुळेच कॅमेऱ्यांच्या चित्रिकरणात अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी न.प.द्वारे कुठलाही फलक लावण्यास मनाई करण्यात आल्याचा सूचना फलकदेखील लावण्यात आला आहे. फलक लावून पालिकेनेच नियमाची पायमल्ली केल्याची बाब स्पष्ट होत आहे.

Web Title: CCTVs in the city are ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.