एकाच अधिकाऱ्यावर बाह्य रुग्णसेवेचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:01 AM2019-07-11T00:01:55+5:302019-07-11T00:03:20+5:30

सेलू तालुक्याच्या ग्रामीण भागासह सेलू शहर करिता असलेल्या एकमेव ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील बाह्य रूग्ण सेवेचा भार एकाच अधिकाऱ्यांवर आलेला आहे.

The burden of external patient services on one authority | एकाच अधिकाऱ्यावर बाह्य रुग्णसेवेचा भार

एकाच अधिकाऱ्यावर बाह्य रुग्णसेवेचा भार

Next
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी : दोन डॉक्टर द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्याच्या ग्रामीण भागासह सेलू शहर करिता असलेल्या एकमेव ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील बाह्य रूग्ण सेवेचा भार एकाच अधिकाऱ्यांवर आलेला आहे.
या रुग्णालयात दूरवरून रुग्ण उपचाराकरिता येतात. त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर असतात अशातच एखादी गंभीर रुग्ण आल्यास डॉक्टरांना त्या रूग्णांकडे लक्ष द्यावे लागते. बाह्य रुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण रांगेत उभे राहून आपला उपचार करून घेण्यासाठी प्रतीक्षा करतात.
रूग्णांना आरोग्य सेवा चांगली मिळावी म्हणून या रुग्ण सेवेवर शासन करोडो रुपये खर्च करीत असले तरी ग्रामीण रुग्णालयात जर रुग्णांना ताटकळत उभे राहून उपचाराची प्रतीक्षा करावी लागत असेल तर या रुग्णालयाचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. येथे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी परिपूर्ण आहे का याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येते आहे. दररोज येथे गरमसुर, आमगाव, हिंगणी, केळझर, सुरगाव, सेलू आदी भागातील रुग्ण येथे मोठ्या प्रमाणात असतात रुग्णांची संख्या लक्षात घेता बाह्य रुग्ण विभागात किती डॉक्टर असावे यांचा आराखडा शासनाने ठरविला नाही. बाह्य रुग्ण विभागासाठी रोज दोन डॉक्टर नेमण्यात यावे अशी मागणी होत आहे. सध्या रुग्णालयात खोकला, सर्दी, डोकेदुखी व खाज या चे रुग्ण जास्त प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे. शासन ग्रामीण भागात डॉक्टर नाहीत, डॉक्टरांची पदे रिक्त आहेत असे सांगून कंत्राटी डॉक्टरांच्या भरोशावर शासकीय आरोग्य सेवा सोडून देत आहे. यांचा फटका ग्रामीण रूग्णांना बसत आहे.

Web Title: The burden of external patient services on one authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.