‘बुद्ध पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:08 PM2019-05-19T22:08:46+5:302019-05-19T22:09:13+5:30

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निर्माण सोशल फोरम मार्फत यावर्षीसुद्धा ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या या मैफलीने रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

'Buddha dawn' with charming mesmerizing | ‘बुद्ध पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध

‘बुद्ध पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्माण सोशल फोरमचा उपक्रम : गौतम बुद्धांची २५६३ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निर्माण सोशल फोरम मार्फत यावर्षीसुद्धा ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या या मैफलीने रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात भन्ते राजरत्न यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नीरज गुजर यांनी माल्यार्पण केले. अनिल जवादे यांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर पूर्ण भिक्षू संघाने सामूहिक बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाला करुणामय रूप प्रदान केले. भिक्षू संघाला चिवर दान करण्यात आले.
बुद्धपहाटची सुरेल पहाट गाजवली ती म्हणजे बाहुबली फेम गायिका, सिने पार्श्वगायिका मधुश्री भट्टाचार्य त्यांच्या सुरेल आवाजाने. संपर्ण वर्धा शहर तथागत गौतम बुद्धांच्या गाण्याने मंत्रमुग्ध झाले.
सिने पार्श्वगायक मृदुल घोष यांनीसुद्धा सुरेल आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फिजिओथेरपिस्ट डॉ. सुमित मेश्राम यांनी कॅनडा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहिले. तेजस अमरकुमार बोरकर या विद्यार्थ्याने थायलंड देशात झालेल्या स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून १४ वर्षे वयोगटात सुवर्णपदक जिंकून संपूर्ण देशाचा गौरव वाढवला. मैत्री प्रमोद ताकसांडे या विद्यार्थिनीने थायलंड मध्ये झालेल्या स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून मुलींच्या १४ वर्षे वयोगटामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून देशाला नवीन उंची प्रदान केली.
रोशन तेलंग आणि मित्र परिवाराने यांनी गाव तिथे संविधान ही मोहीम राबवून जवळपास ५५० गावात स्वखर्चाने संविधान वाटप केले. या उपक्रमाची महाराष्ट्र शासनानेदेखील घेतली. या संपूर्ण यशस्वी लोकांचा सत्कार निर्माण सोशल फोरमचे संस्थापक व नगर परिषदेचे माजी अध्यक्ष नीरज गुजर यांनी शाल, बुके आणि सन्मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला. नीरज भाऊ गुजर यांनी आपल्या संबोधनात संपूर्ण जनतेला बुद्धा च्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले. यावेळी नीरज गुजर यांनी विचार व्यक्त केले.
समाजातील बहुमूल्य योगदानासाठी संपूर्ण भिक्षू संघाने नीरज गुजर यांना बुद्धांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. बुद्ध धम्मात खिरदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. बुद्धपहाटची खीर दान करून सांगता करण्यात आली. भल्या पहाटे आयोजित या मैफलीमुळे वातावरण बुद्धमय झाले होते. सर्वच स्तरातील नागरिकांची मैफलीकरिता मोठी उपस्थिती होती.

Web Title: 'Buddha dawn' with charming mesmerizing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.