बिबट्याच्या मृतदेहाने परिसरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:53 PM2019-03-15T23:53:31+5:302019-03-15T23:53:57+5:30

शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अवैध शिकार प्रकाराचा तो बळी तर ठरला नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे.

The body of the leopard rattled the area | बिबट्याच्या मृतदेहाने परिसरात खळबळ

बिबट्याच्या मृतदेहाने परिसरात खळबळ

Next
ठळक मुद्देवाघाडी नदीच्या पुलाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अवैध शिकार प्रकाराचा तो बळी तर ठरला नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवालावरून अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.
मृतक मादी बिबट अडीच ते तीन वर्ष वयोगटातील आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास सध्या वनविभागाच्यावतीने बांधल्या जात आहे. सकाळी रमेश घोडमारे हे दुचाकीने वर्धेकडून गिरडकडे जात असताना त्यांना शेडगाव मार्गावरील वाघाडी नदीच्या पुलाजवळ एक बिबट मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ त्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह वन परिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाभळे व क्षेत्र साहाय्यक विजय धात्रक यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. विशेष म्हणजे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
बिबट्याच्या मृतदेहाची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाचे पी. डी बाभळे, विजय धात्रक, ए. आर. चौधरी, एल. एन चौखे, वाय. बी. बेहते, दिग्रसकर तर समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे, ओमप्रकाश इंगोले, चंद्रशेखर रोहनकर आदींनी बघ्यांची गर्दी बाजूला सारून पंचनामा केला. या घटनेची नोंद वनविभागाने घेतली आहे.

Web Title: The body of the leopard rattled the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.