भाजप सरकार खोटारडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:28 PM2017-12-03T23:28:21+5:302017-12-03T23:28:49+5:30

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

BJP government falsehood | भाजप सरकार खोटारडे

भाजप सरकार खोटारडे

Next
ठळक मुद्देसुप्रिया सुळे : राकाँची हल्लाबोल पदयात्रा जिल्ह्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यवतमाळ ते नागपूर या हल्लाबोल रॅलीचे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाल्यानंतर शिरपूर (होरे) येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर या १५३ कि़मी. अंतराच्या हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर रविवारी सायंकाळी दाखल झाली. सदर पदयात्रा जिल्ह्याच्या सिमेवर दाखल होताच शिरपूर (होरे) येथे एक सभा झाली. यावेळी मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, शरद तसरे, माजी खासदार गणेश दुधगावकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी खा. सुळे म्हणाल्या, या सरकारला सत्तेतून घालविणे गरजेचे झाले असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या आधी शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून सातबारा कोरा केला होता. परंतु भुलथापा देणाºया या सरकारने शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीचा खेळ मांडला आहे. महिलांनो मोठ्या संख्येनी नागपूरला या आपण सर्वमिळून या सरकारवर लाटणे घेवून हल्लाबोल करू, अशी हाक खासदार सुळे यांनी सभेतून दिली.
सभेपूर्वी हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्याच्या सीमेवर येताच सहकार नेते सुरेश देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाºयांनी स्वागत केले. शेतकºयांचा सातबारा ताबडतोब कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या, कापूस, तूर, सोयाबीनसाठी खरेदी केंद्रे सुरू करा, विषारी औषधी फवारणीमुळे बळी पडलेल्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्या, खोटी आश्वासने फसव्या, जाहिराती जनतेच्या माथी मी लाभार्थी अशा अनेक घोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यानंतर ही रॅली सत्यसाई मेहर सेंटर भिडी येथे मुक्कामी पोहचली. सोमवारला सकाळी ही रॅली देवळीकडे आगेकुच करून रात्रीला मुक्कामी राहणार आहे.
या हल्लाबोल रॅलीत माजी आमदार वसंतराव कार्लेकर, किशोर माथनकर, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, खविस अध्यक्ष अमोल कसनारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शरयू वांदिले, शारदा केने, विणा दाते, विद्या सोनटक्के, मोरे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, प्रा. खलील खतीब, सुरेश डफरे, दिवाकर मून, हनुवंत नाखले, नितीन देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पदयात्रेचा कार्यक्रम
ही पदयात्रा सोमवारी सकाळी ९ वाजता भिडी येथील यशवंत विद्यालय निघून देवळीला पोहोचणार आहे. देवळी येथील कार्यक्रमानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजता देवळी येथील भोंग मंगल कार्यालयातून रवाना होवून रात्री वर्धा येथे पदयात्रेचे आगमन होणार आहे. ६ डिसेंबरला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करुन पदयात्रेला सुरुवात होईल. रात्री सेवाग्राम येथे मुक्कामानंतर ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बापुकूटी येथे भेट देवून पदयात्रा सेवाग्राम-पवनार मार्गे सेलू येथे पोहोचणार आहे. शुक्रवारी ८ डिसेंबरला सकळी ९ वाजता माहेर मंगल कार्यालयातून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. रात्री खडकी येथे मुक्कामानंतर शनिवार ९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.

Web Title: BJP government falsehood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.