भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:12 PM2018-08-19T22:12:52+5:302018-08-19T22:13:53+5:30

राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

The BJP betrayed the people | भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला

Next
ठळक मुद्देतानसेन नंनावरे : पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. भाजप सरकारने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आंबेडकरी जनता धडा शिकवेल, असे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नंनावरे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
तानसेन नंनावरे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता दिली. भाजपाचा संविधान बदलविण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. हिंदू राष्ट्राला आमचा विरोध नाही; पण ते मनोस्मृतीवर आधारीत नसावे. भाजपा सरकार प्रत्येक जात एक दुसऱ्याच्या विरोधात उभी करीत आहे. २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास संविधान बदलविले जाईल. संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठीशी घालत आहे. ना. रामदास आठवले त्यांच्याकडून आंबेडकरी जनतेचे प्रश्न दिल्ली दरबारी न मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तृती करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची दिशाभूलच करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
पुढील २०१९ ची निवडणूक निर्णायक राहणार असून त्यावेळी आम्ही वास्तविक परिस्थिती जनतेसमोर ठेवून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करू. नुकतीच आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून वर्धा जिल्ह्यातील काही राजकीय पुढाºयांचीही भेट आम्ही घेणार आहो. वर्धा जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नव्या जोमाने काम करावे, असेही आवाहन यावेळी तानसेन नंनावरे यांनी केले. पत्रकार परिषदेला नितीन मोरे, आनंद निरभोवणे, अशोक खरात आदींची उपस्थिती होती.
संभाजी भिडे यांना राज्यसरकार पाठीशी घालतेय
राज्यात काही व्यक्ती राष्ट्रच्या एकात्मतेला धोका पोहोचेल असे कारस्थान करीत आहेत. त्यांना आळा घालण्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असून संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तीला राज्यातील भाजपा सरकार पाठिशीतच घालत असल्याचा आरोप याप्रसंगी तानसेन नंनावरे यांनी केला.

Web Title: The BJP betrayed the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा