भूमिपूजन झाले, कामाला सुरुवात कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:32 AM2018-11-21T00:32:49+5:302018-11-21T00:34:58+5:30

विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे बोर तिरावर घाट बांधकामाचे भूमीपूजन होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला. प्रत्यक्ष कामाला काही सुरूवात होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Bhumi Pujan, when will the work start? | भूमिपूजन झाले, कामाला सुरुवात कधी होणार?

भूमिपूजन झाले, कामाला सुरुवात कधी होणार?

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच महिन्यांचा कालावधी लोटला : निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे बोर तिरावर घाट बांधकामाचे भूमीपूजन होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला. प्रत्यक्ष कामाला काही सुरूवात होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. या कामाची डिझाईन नागपूर येथील वास्तु विशारद बांधकाम विभागाला उपलब्ध करून देणार आहेत पण ती अजूनही देण्यात आली नसल्याने सदर काम सुरू होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
१४ फेब्रुवारीला बोर तिरावर घाटाचे बांधकाम करण्याची घोषणा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली होती.यासाठी निधीही उपलब्ध झाल्याचे त्यावेळी सांगितले होते. येथून तब्बल सात महिन्यांनतर भूमीपूजनाचा मुहूर्त शोधला गेला पोळ्याच्या पाडव्याला १० सप्टेंबरला थाटात बोरतिराचे रूपडे पालटणारा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देत आमदार समीर कुणावार यांना संत केजाजी महाराज पुण्यतिथीला येण्याचे निमंत्रणही देण्यात आले. पुण्यतिथी महोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असताना घाटाच्या कामाला सुरूवात झाली नाही. २६३-६८ लक्ष रुपयाचा निधी बोरतिराचे रूपडे पालटण्यासाठी आमदार पंकज भोयर यांनी आणला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत सदर काम होणार आहे. सेलू येथील विश्रामगृहात असणाºया कार्यालयात याबाबत विचारणा करण्यास गेलो असता येथील अधिकाºयांच्या रित्या खुर्च्या पाहुण माघारी फिरण्याशिवाय पयार्य नाही. तर भ्रमणध्वनीला साद देण्याचीही तसदी अधिकारी दाखवत नाही.
डिझाईनचा आराखडा रखडला
घोराड येथील मंदीर परिसराला लागून बोर नदी आहे. बोरनदीच्या घाटाचे सौंदर्यीकरण व बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना स्नान करण्यासाठी प्रसाधन गृह व शौचालयही बांधकाम होणार आहे. मात्र या सर्व बांधकामाची डिझाईन नागपूर येथून तयार करून दिली जाणार आहे. ती बांधकाम विभागाला मिळाल्यानंतर कंत्राटदार सदर काम सुरू केले जाणार आहे.मात्र अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही डिझाईन मिळालेली नाही.

Web Title: Bhumi Pujan, when will the work start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.