‘त्या’ वॉर्डनच्या बदलीनंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:28 PM2018-02-24T22:28:17+5:302018-02-24T22:28:17+5:30

येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनींनी महिला वॉर्डनच्या अनियमित व अरेरावी वागणाऱ्या संदर्भात शुक्रवार विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या फाटकाला कुलूप लावून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले.

'That' behind the movement after the change of the warden | ‘त्या’ वॉर्डनच्या बदलीनंतर आंदोलन मागे

‘त्या’ वॉर्डनच्या बदलीनंतर आंदोलन मागे

Next
ठळक मुद्देशासकीय वसतिगृहातील मुलींच्या आंदोलनाला यश

ऑनलाईन लोकमत
कारंजा (घा.) : येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनींनी महिला वॉर्डनच्या अनियमित व अरेरावी वागणाऱ्या संदर्भात शुक्रवार विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या फाटकाला कुलूप लावून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल वरिष्ठांनी तात्काळ निर्णय घेत या वसतिगृहाच्या अधीक्षकाची बदली केली.
शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अघिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत अन्नाचा कणही घेतला नाही. याची माहिती मिळतारच दुपारी नागपूरच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वसतिगृह गाठले. आणि महिला वॉर्डन वनीता येलकर यांना बदली केल्याचे लेखी कळविले. यानंतरच मुलींनी कुलूप काढून वसतीगृहात प्रवेश केला. तोपर्यंत महिला वॉर्डनला बाहेर उभे ठेवले. परीक्षेचा काळ सुरू असताना शिक्षण क्षेत्रात असा गोंधळ घडावा, याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.
कारंजा येथे २००९ ला शिक्षक कॉलनीचे बाजूला एका मंगल कार्यालयात मुलीचे शासकीय वसतीगृह भाड्याने सुरू आहे. येथे एकूण ७७ विद्यार्थिनी आहेत. व्यवस्थापन पाहण्याकरिता महिला वॉर्डन व लिपीक आहे. महिला वॉर्डन सकाळी येते आणि सायंकाळी ५ वाजता नागपूरला निघून जाते हा तिचा नित्यक्रम आहे. वसतीगृहातील मुलींना रात्रभर रामभरोसे वाºयावर सोडून दिले जाते. तसेच येथे अनेक समस्या आहे. या समस्या व वागणुकीबद्दल अनेकवार वरिष्ठांकडे नागपूरला तक्रार करण्यात आली, पण कारवाई झाली नाही.
२२ फेबु्रवारीला काही मुलींनी नागपूरला जावून ७७ निवेदन, वरिष्ठ अधिकाºयांना दिले. होस्टेल वॉर्डन वनीता येलकर यांची त्वरीत बदली करण्याची मागणी केली. याकडे दुर्लक्ष झाल्याने नाईलाजाने २३ फेबु्रवारीला सर्व मुलींनी एकत्र येवून वसतीगृहाच्या गेटला कुलूप लावून आंदोलन केले. वॉर्डनला बाहेरच ठेवले. माहिती मिळताच नागपूर समाजकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी मीना मेश्राम व एस.एच.माटे यांनी वसतिगृह गाठत मुलींच्या समस्या व मागण्या ऐकून घेत वॉर्डनची बदली करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: 'That' behind the movement after the change of the warden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.