अखिल भारतीय अधिकाऱ्यांची पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:01 PM2018-10-15T22:01:05+5:302018-10-15T22:01:23+5:30

राष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापात्रा, अमरावती विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख डॉ सुनील सूर्यवंशी यांनी वर्धा जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम पशु अनाथ आश्रमात सदिच्छा भेट दिली.

All India officials visit People for Animals | अखिल भारतीय अधिकाऱ्यांची पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला भेट

अखिल भारतीय अधिकाऱ्यांची पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापात्रा, अमरावती विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख डॉ सुनील सूर्यवंशी यांनी वर्धा जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम पशु अनाथ आश्रमात सदिच्छा भेट दिली. गौवंश संवर्धनाकरिता करुणाश्रमामार्फत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमाची माहिती जाणून घेतली. पीपल फॉर एनिमल्स च्या सर्व कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी व अभिषेक गुजर, सुमित जैन, रोहित कंगाले, अमित बाकडे, निवेदिता गोस्वामी, नारायण गोस्वामी, कुसुम गोस्वामी आदी उपस्थित होते.

Web Title: All India officials visit People for Animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.