३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:27 PM2019-02-07T22:27:23+5:302019-02-07T22:28:02+5:30

गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

30 rupees board | ३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

Next
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या नावावर गावकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आ.) : गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विरुळ गावासह परिसरातील काही गावात खासगी इसमांकडून नागरिकांना घराच्या दारावर लावण्याकरिता स्वच्छ भारत अभियानचे फलक दिल्या जात आहे. सदर इसम स्वत:च हे फलक लावून देत प्रत्येकाकडून तीस रुपये घेत असल्याचे सांगितल्या जाते. याबाबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून कोणताही आदेश नसताना ग्रामस्थांकडून फलकाच्या नावावर तीस रुपये वसूल करणारे कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात काही खाजगी इसम गावात आले. त्यांनी गावातील प्रत्येकांच्या घरावर स्वच्छ भारत अभियानाचे फलक दारावर लावले. काहींनी याकडे दुर्लक्ष करीत फलक लावून घेतले व त्याचे पैसेही दिले. पण, ग्रामपंचायतलाही याबाबत कुठलाच आदेश नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक सतर्क झाले. ग्रामपंचायतला माहिती नसतानाही सदर इसम कसे काय गावात येऊन प्रत्येकाच्या घरावर फलक लावू शकतो?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता गावात कुठेही स्वच्छता दीसत नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहे. शेणखत रस्त्यावर पडून असल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. हगणदारीमक्तीचा बोजवारा उडाला आहे. यातुनच मागील वर्र्षी साथरोग पसरुन एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. गावात अशी स्वच्छतेचा असा बोजवारा उडाला असताना गावातील प्रत्येक घरावर स्वच्छ भारत अभियानचे फलक लावण्याचा सपाटा सुरु आहे. प्रत्येकाकडून तीस रुपये घेऊन हजारो रुपये उकळले जात आहे. त्यामुळे यामार्ग कर्ता करविता कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. हाही आदेश कदाचित जिल्हा परिषदेतून तर धडकला नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करु न माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: 30 rupees board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.