२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:38 PM2018-06-28T23:38:46+5:302018-06-28T23:39:06+5:30
कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले.
पंचवटी : ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास २०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. बंदी असताना प्लॅस्टिक पिशव्या वापरल्याने सहा दुकानदारांकडून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.९) पंचवटी मनपाच्या आरोग्य विभाग पथकाने दिंडोरीरोड, बाजार समिती बाहेरील दुकानात ही कारवाई केली आहे. ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरल्याने त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो, तसेच दरवर्षी पावसाळ्यात या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे नाले, गटार चोकअप होत असतात. पंचवटी विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संजय गोसावी, किरण मारू, सुधाकर शिंदे, डी. बी. माळेकर, दीपक चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.