१७.३२ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:46 AM2017-08-17T00:46:46+5:302017-08-17T00:47:21+5:30

स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या उत्सवात व्यस्त असलेले पोलीस वाहनांची तपासणी करणारा नाही असा कयास बांधून दारूची अवैध वाहतूक करणारे सज्ज झाले होते.

17.32 lakhs of liquor seized | १७.३२ लाखांचा दारूसाठा जप्त

१७.३२ लाखांचा दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : तिघांविरुद्ध गुन्हे, आजदा शिवारात केली नाकेबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या उत्सवात व्यस्त असलेले पोलीस वाहनांची तपासणी करणारा नाही असा कयास बांधून दारूची अवैध वाहतूक करणारे सज्ज झाले होते. परंतु नेहमीच दक्ष राहणाºया एलसीबीच्या पथकाने मंगळवारी आजदा शिवारात नाकेबंदी करून वाहनासह १७.३२ लाखाचा दारूसाठा पकडून तिघांविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले.
गोपनिय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने १५ आॅगस्टला आजदा शिवारात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली. यावेळी एम.एच. ४० वाय. ४९४५ क्रमांकाच्या मालवाहूची अडवून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत ९ लाख ७४ हजार १०० रुपये किंमतीच्या ९० मिलीच्या ६ हजार ४९४ विदेशी दारूच्या शिश्या, १८० मिलीच्या २८८ दारूच्या शिश्या किंमत ८६ हजार ४०० रूपये, ७२ हजार रुपये किंमतीच्या ७५० मिलीच्या ७२ शिश्या व ६ लाख किंमतीचा मालवाहू असा एकूण १७ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान समुद्रपूर पोलिसात सुभाष उर्फ बालू सावरकर, शंकर दानानी व राजू गुड याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात पीएसआय पोटे, अचल मलकापुरे, पंकज पवार, किटे, वैभव कटजवार, जाधव आदींनी केली.
२.१७ लाखाचा दारूसाठा पकडला
समुद्रपूर - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गिरड येथील छबु तिजारे हिच्या घरी व साहेबराव तेलरांधे याच्या शेतातील गोठ्यात छापा टाकून एकूण २.१७ लाखाचा देशीदारूसाठा जप्त केला. छबु तिजारे हिच्या घरातून पोलिसांनी पाच पेटी देशीदारू तर साहेबराव तेलरांधे यांच्या शेतातील गोठ्यातून २५ पेट्या देशीदारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. कारवाईदरम्यान छबू अंबादास तिजारे (४५) व साहेबराव तेलरांधे याच्याविरुद्ध समुद्रपूर पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी योगेश चन्ने, दिनेश तुमाने, विलास गमे, रणजीत काकडे, शितल चौधरी, अजय वानखेडे यांनी केली.

Web Title: 17.32 lakhs of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.