१३३३ शेतकऱ्यांनी केली चाराटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:10 PM2019-05-16T22:10:04+5:302019-05-16T22:10:53+5:30

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे.

1333 farmers overcome barricades | १३३३ शेतकऱ्यांनी केली चाराटंचाईवर मात

१३३३ शेतकऱ्यांनी केली चाराटंचाईवर मात

Next
ठळक मुद्देवैरण विकासाला लागला हातभार : पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने विविध योजनेतून कड्याळू, मका, चारा, ठोंबे बियाणे शेतकऱ्यांना पुरविल्याने मोठा हातभार लागला आहे. वैरण विकास योजनेचा जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३३३ शेतकऱ्यांनी लाभ घेत चारालागवड करीत टंचाईवर मात केली आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होताच प्रशासनाने चाराटंचाई व्यवस्थापनाविषयी संबंधित विभागाला शेतकºयांमध्ये जनजागृती करीत वैरण बियाणे वाटप करण्याबाबत निर्देश दिले. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला. या अंतर्गत पशुसंवर्धन विभागाने मोफत बियाणे वितरण कार्यक्रम राबवत उद्दिष्टपूर्ती साधली आहे.
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा आहे. वाढत्या उष्णतामानामुळे नदी-नाल्यांना कधीचीच कोरड पडली आहे. उन्हाचा तडाखा, दुष्काळी परिस्थितीत निर्माण झालेली पाणीटंचाई, पशुखाद्य आणि चाºयाचे वाढलेले भाव अशा वेळी गोपालकांपुढे आव्हान उभे ठाकले होते.
जिल्ह्यातील गावखेड्यात गाय, म्हैस, बैल, शेळयांसह इतर पाळीव जनावरे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेकांनी पाळली. चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाई-म्हशी पाळताना दिसतात. पशुपालक आणि दुग्धव्यवसायावर अनेकांनी बेरोजगारीवर मात करीत समृद्ध झाले. मात्र, यंदा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला असतानाच चाराटंचाईमुळे गोपालकांचे हाल होऊ लागले. यामुळे अनेकांनी जनावरे विक्रीचा सपाटा सुरू केल्याने पशुधनाची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे.
अशाही परिस्थितीत दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार करीत जिल्ह्यातील १ हजार ३३३ होतकरू शेतकºयांनी वैरण बियाणे, ठोंबे लागवड करून चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केली. चाºयाचे नियोजन नसल्याने चिंताग्रस्त हजारो पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांची लागवड केल्याने उन्हाळ्याच्या दिवसातदेखील मुबलक चारा उपलब्ध झाला. यामुळे दुग्धव्यवसाय सुरळीत आहे.
टंचाईची ओरड, बैठकीकडे फिरविली पाठ!
आर्वी, आष्टी, कारंजा हे तीन तालुके शासनातर्फे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. येथे भीषण पाणी आणि चाराटंचाई आहे. यामुळे जनावरांचे हाल आहेत. अशा स्थितीत संबंधित पंचायत समितीस्तरावरून चारा छावणीसंदर्भात मागणी अपेक्षित आहे. मात्र, संबंधित एकाही तालुक्यातून प्रस्ताव आला नाही. याकरिता गुरुवारी कारंजा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक अधिकारी, पदाधिकाºयांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याने चाराप्रश्नी दुष्काळग्रस्त तालुक्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.
चारा डेपोविषयी प्रस्ताव नाहीच
जिल्ह्यातील ग्रामीण भागात चाराटंचाई उग्र झाली आहे. यामुळे पशुपालकांचे होत आहे. टंचाईविषयी सातत्याने ओरड होत असली तरी जिल्ह्यातून आठही पंचायत समितीस्तरावरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे चारा डेपो सुरू करण्याबाबत एकही प्रस्ताव, मागणी प्राप्त झाली नसल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेकांनी केली रोजगारनिर्मिती
दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. याचाच परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाले अन् नैसर्गिकरीत्या उगवणाºया वैरणाची टंचाई निर्माण झाली. यातच पशुखाद्याचे भावही कडाडले. यामुळे पशुपालकांसमोर जनावरांचे पालन-पोषण कसे करायचे, असा पेच पडला होता. ही परिस्थिती लक्षात घेत जिल्ह्यात दुर्लक्षित वैरण खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांनी रोजगारनिर्मिती केली आहे.

Web Title: 1333 farmers overcome barricades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी