जिल्ह्यात सिकलसेलचे १२ हजार ३५९ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:05 AM2018-06-25T00:05:13+5:302018-06-25T00:06:26+5:30

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९३९ रुग्ण व १२ हजार ३५९ सिकलसेलचे वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विचार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी व्यक्त केले.

12 thousand 359 carriers in the district | जिल्ह्यात सिकलसेलचे १२ हजार ३५९ वाहक

जिल्ह्यात सिकलसेलचे १२ हजार ३५९ वाहक

Next
ठळक मुद्देअजय डवले : जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९३९ रुग्ण व १२ हजार ३५९ सिकलसेलचे वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विचार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी व्यक्त केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व नामदेव महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, डॉ. चकोर रोकडे, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. कोडापे, डॉ. अनुजा बारापात्रे, स्मिता वासनिक, पुनसे यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ. डवले म्हणाले, सिकलसेल वाहकाने निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास येणारे अपल्य निरोगी जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. याकरिता लग्नापूर्वी उपवर मुलांमुलींच्या रक्ताची तपासणी करणे, निरोगी सिकलसेल पिढी जन्माला येण्यासाठी गरजेचे आहे. समाजात याबाबत जनजागृती करण्याकरिता प्रत्येकांनी सर्व जाती जमातीतील लोकांनी विशेषत: अनु.जाती जमातीतील लोकांनी सिकलसेल चाचणी करण्याकरिता समाजात जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिकलसेल रुग्णांकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ या रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी या रोगाच्या जनजागृतीकरिता कार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी केले.
सिकलसेल आजाराचा इतिहास वाचन मनन व चिंतन तसेच शासकीय सोईसुविधांबाबत माहिती तसेच सिकल हिमोग्लोबीन व नॉर्मल हिमोग्लोबीन याबाबत शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती देण्यात आली. याचा लाभ रुग्णांची घ्यावा असे आवाहन डॉ. थोरात यांनी आपल्या प्रमुख स्थानावरून बोलताना केले.
सिकलसेल आजार हा आदिवासी भागात जास्त प्रमाणात आढळून येतो; परंतु जिल्ह्याची सिकलसेल रुग्णांची संख्या बघितल्यास या आजाराची गंभीरता लक्षात येतो, जिल्ह्यात सिकलसेलकरिता सोल्युबिलीटी व इलेक्ट्रोफोरेसीस या दोन तपासण्या असून, सोल्युबिलीटी तपासणी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात नि:शुल्क करण्यात येते तर, इलेक्ट्रोफोरेसीस तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा उपजिल्हा रुग्णालय आर्वी व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे नि:शुल्क करण्यात येते. तसेच सिकलसेल रुग्णांना आरोग्य विभागामार्फत मोफत रक्त संक्रमणाची व्यवस्था आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे मनोगत डॉ. चकोर रोकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार सिकलसेल समुपदेशक देवांगणा वाघमारे यांनी मानले. प्रास्ताविक सिकलसेल समन्वयक अन्नपूर्णा ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रशांत कठाणे, अंकुश कांचनपुरे, हर्षद ढोबळे, विनोद शेट्ये, जयमाला चोरमले, पंकज महाबुधे, राहुल बुचुंडे व नर्सीग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 12 thousand 359 carriers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य