उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:26 PM2018-10-11T14:26:37+5:302018-10-11T14:28:47+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Youth Congress morcha Against Fuel Costs hike in Osmanabad | उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

googlenewsNext

उस्मानाबाद - पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उस्मानाबाद शहरातील सूर्यकांत पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने केल्यानंतर युवक जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा शिवाजी चौकात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधी घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची जोरदार भाषणे झाली. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. 2014 साली झालेल्या निवडणुकीत  दिलेल्या आश्वासनाचा मोदी सरकारला विसर पडल्याचे ते म्हणाले.

Web Title: Youth Congress morcha Against Fuel Costs hike in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.