In Yadshi, Ashram under fire; four lakhs of asset burn | येडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक
येडशीत आश्रमाला आग लागून चार लाखाचे साहित्य खाक

येडशी (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री संत रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ यांच्या आश्रमास अचानक लागलेल्या आगीत जवळपास चार लाखाचे साहित्य जळून खाक झाले़ ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली़

येडशी येथील श्री संत रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ यांच्या आश्रमात गुरूवारी सकाळी आरती झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत गेले़ त्यानंतर काही वेळातच आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली़ या आगीत लाकडी माळवद, शैक्षणिक, धार्मिक साहित्य व वाद्यकाम साहित्य आदी चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़

यावेळी चांगदेव गडकर, सौदागर चव्हाण, शहाजी शिंदे, श्रीकृष्ण तापडे, महादेव सस्ते, मंगेश देशमुख, बाळासाहेब जाधव व नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग अटोक्यात आली़ पोहेकॉ विलास जाधव, आनंद कांबळे, बी़डी़तांबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ या प्रकरणी महादेव इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मित जळीतची नोंद करण्यात आली आहे़ तपास  पोहकॉ विलास जाधव हे करीत आहेत़


Web Title: In Yadshi, Ashram under fire; four lakhs of asset burn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.