कळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील गौर येथील एका प्रभागातील मतमोजणीत ‘नोटा’ला २३६ मते मिळाली होती. यावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ते मतदान अधिकारी अशा सात कर्मचाºयांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची मंगळवारी मतमोजणी झाली. यावेळी गौर व आवाड शिरपुरा येथील मतदान व मतमोजणीसंदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. गौर येथील प्रभाग ३ मध्ये एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित होती.
मंगळवारी मतमोजणीत ‘नोटा’ला २३६ मते पडल्याची नोंद झाली होती. यावर येथील उमेदवार शोभा अवधूत यांचे मतदान प्रतिनिधी सिद्धेश्वर अवधूत यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. बागल (विस्ताराधिकारी, गटशिक्षण), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस.
धावारे (केंद्रप्रमुख, गटशिक्षण), सहाय्यक तलाठी यु. सी. घुले,
मतदान केंद्राध्यक्ष आर. बी. बिक्कड (प्रा.शा. पाथर्डी), मतदान अधिकारी बी. डी. कदम (कन्या प्रशाला, कळंब), आर. ए. उकिरडे (प्रा.शा. बोरगाव बु), एस. टी. समुद्रे (प्रा.शा. बोरगाव बु) या सात कर्मचाºयांचे निलंबन झाले़
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.