शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 07:14 PM2019-04-16T19:14:16+5:302019-04-16T19:16:35+5:30

व्हीडिओद्वारे बदनामी केल्याचे प्रकरण

Shiv Sena MP filed a complaint against own party candidate in Osmanabad | शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल

शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल

googlenewsNext

उमरगा (उस्मानाबाद) : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (महायुती) उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी व्हीडिओद्वारे बदनामी केल्याची तक्रार त्यांच्याच पक्षाचे खासदार रवी गायकवाड यांनी केली आहे़ याप्रकरणी उमरगा ठाण्यात मंगळवारी उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

निवडणूक लागल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा एक व्हीडिओ मतदारसंघात चांगलाच व्हायरल झाला होता़ यामध्ये ते खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांच्या नावाने शिवीगाळ करीत असल्याचे दिसत होते़ सोशल मिडीयात हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार रवी गायकवाड यांनी मंगळवारी उमरगा पोलीस ठाणे गाठले़ त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे़ त्यात राजेनिंबाळकर यांनी व्हीडिओद्वारे आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत़ शिवीगाळ करुन आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ हा व्हीडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्याने आपली बदनामी झाल्याचे म्हटले आहे

या तक्रारीनुसार उमरगा पोलिसांनी ओम राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६५, ६६, ६७ व भादंविच्या ५००, ५०१, ५०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर रवी गायकवाड हे दुपारी उस्मानाबादेत दाखल झाले होते़ त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दिली़ मात्र, या विषयावर बोलण्यास टाळले़ दरम्यान, ओम राजनिंबाळकर यांनी ४ एप्रिल रोजी ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ढोकी पोलिसांकडे तक्रार दिली होती़ हा व्हीडिओ आपली बदनामी करण्याकरिता संगणकाच्या मदतीने डबिंग करुन व्हायरल केल्याची ही तक्रार होती़ त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोमवारीच ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

तो व्हीडिओच खोटा : राजेनिंबाळकर
ज्या व्हीडिओवरुन माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तो व्हीडिओच मुळात खोटा आहे़ याबाबत आपल्या तक्रारीवरुन गुन्हाही दाखल झाला आहे़ तरीही पोलिसांनी कश्याच्या आधारे गुन्हा दाखल केला, हे कळायला मार्ग नाही़ शिवाय, ज्या आदरणीय रवी गायकवाड यांच्यासाठी आपण गेल्या दोन निवडणुकांत रक्ताचे पाणी करुन प्रचार केला़ त्यांच्याकडून विरोधकांना मदत व्हावे, अशी कृती झाली याची खंत वाटत आहे़
- ओम राजेनिंबाळकर, सेना उमेदवार

Web Title: Shiv Sena MP filed a complaint against own party candidate in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.