...अन्यथा तुळजाभवानी मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:52 AM2018-03-30T05:52:19+5:302018-03-30T05:52:22+5:30

अतिमहत्वाच्या भाविकांना सोन्या-चांदीचा ‘प्रसाद’ वाटल्याने चर्चेत आलेल्या

... otherwise seize the property of the Tulja Bhavani temple | ...अन्यथा तुळजाभवानी मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करा

...अन्यथा तुळजाभवानी मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करा

googlenewsNext

उस्मानाबाद : अतिमहत्वाच्या भाविकांना सोन्या-चांदीचा ‘प्रसाद’ वाटल्याने चर्चेत आलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या विश्वस्तांसमोर कर्मचाऱ्यांची देणी थकविल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यांची थकित रक्कम तत्काळ न दिल्यास मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश लातूर सहायक कामगार आयुक्तांनीे दिले आहेत.
संस्थानचे मंदिरातील सेवानिवृत्त शिपाई प्रकाश मोहन सोंजी, दत्तात्रय शंकर शेळके, सुरक्षा रक्षक अरूण एकनाथ माने, श्रीधर गणपत शिंदे आणि पांडुरंग पंढरी सोनवणे यांच्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तसेच महागाई भत्ता संस्थानकडे थकीत आहे. तो मिळत नसल्याने या पाच जणांनी डिसेंबर २०१३ मध्ये कामगार न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कर्मचाºयांची थकित देणी तातडीने देण्याबाबत संस्थानला आदेश देण्यात आले होते़ तरीही ही रक्कम देण्यात येत नसल्याने अखेर लातूरच्या सहायक कामगार आयुक्त एस़जी़ मुंढे यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. संबंधित कर्मचाºयांना फरकाची रक्कम व त्यावरील व्याज १२ टक्के प्रमाणे त्वरित द्या अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू
सहायक कामगार आयुक्तांचे पत्र मिळाले आहे़ महसुली पद्धतीने वसुली करुन कर्मचाºयांची थकित रक्कम देण्याची सूचना त्यांनी केली आहे़ त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे़ कर्मचाºयांचे थकीत देणे अंदाजे ८ लाख रुपये निघेल़ दे देण्याची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे. देणी न दिल्यासच मालमत्ता गोठवून लिलाव किंवा विक्रीद्वारे मिळणाºया रकमेतून त्यांची देणी द्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
- राहुल पाटील, प्रशासकीय व्यवस्थापक, मंदिर संस्थान

Web Title: ... otherwise seize the property of the Tulja Bhavani temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.