Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 03:19 PM2019-07-18T15:19:04+5:302019-07-18T15:21:16+5:30

भूम तालुक्यातील ईट गावचा गणेश दहावीनंतर पुण्याला नोकरीसाठी गेला. त्यावेळी, मिळेत ते काम करण्याच्या उद्देशाने गणेशन ट्रकवर क्लिनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

'Never had toilets at home, now built 484 toilets in town, story of a osmanabad farmer boy | Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

googlenewsNext

उस्मानाबाद - जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका लहानशा गावातील गणेश देशमुख या तरुणाने गावात तब्बल 484 शौचालय बांधून दिले आहेत. विशेष म्हणजे घरातील हालाकीच्या परिस्थितीमुळे एकेकाळी गणेश यांच्या घरीही शौचालय नव्हते. वडील 600 रुपये महिना पगारीव पीठाच्या गिरणीत कामाला जात. तर 2006 मध्ये दहावीनंतर शिक्षणाचा खर्च झेपू शकत नसल्याने गणेशने नोकरीसाठी पुणे गाठले होते. मात्र, गावशी जोडलेली नाळ कायम असल्यानेच सामाजिक बांधिलकीतून गणेशने स्वत:च्या घरासह ईट गावात 484 शौचालय बांधून दिले. 

भूम तालुक्यातील ईट गावचा गणेश दहावीनंतर पुण्याला नोकरीसाठी गेला. त्यावेळी, मिळेत ते काम करण्याच्या उद्देशाने गणेशन ट्रकवर क्लिनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. हळूहळू गाडीवर ड्रायव्हींगचेही काम शिकले. मात्र, या कामातून केवळ गरजेपुरतेच उत्पन्न होत. त्यामुळे गणेशने हळू हळू पैसे साठवून आणि मालकाच्या मदतीने कर्ज काढून एक ट्रक विकत घेतला. या ट्रकचे पैसे काही दिवसांतच फिटल्याने गणेश यांनी दुसरा ट्रक विकत घेतला. अशारितीने एकामागून एक असे 15 ट्रक गणेश यांनी विकत घेतले. तसेच, स्वत:चा ट्रान्पोर्टचा व्यवसायही सुरू केला. आता, एकेकाळी शिक्षणासाठी पैसे नसल्याने गाव सोडणारा गणेश करोडपती असून 15 ट्रकांचा मालक आहे. मात्र, पैसे कमावल्यानंतर या कामातून समाधान मिळत नसल्याने गणेशने गावासाठी काहीतरी करायचा निर्णय घेतला. त्यातून, सामाजिक बांधिलकी जपत गणेशने गावात तब्बल 484 शौचालय बांधून दिले. 

काही दिवसांपूर्वी गणेश आपल्या ईट या गावी आले होते. त्यावेळी, अद्यापही आपल्या घरात शौचालय नसल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तर, गावातील अनेक नागरिकांच्या घरात शौचालय नसल्याचे गणेश यांनी पाहिले. त्यामुळे गणेश यांनी आपल्या घरापासून सुरूवात करताना, आपल्या ईट या गावासह आजुबाजूच्या 5 गावांत मिळून तब्बल 484 शौचालय बांधून दिले आहेत. गणेश यांच्या या उपक्रमाचे गावात कौतुक होत असून पोरानं जिद्दीनं कमावून दाखवलं, असेही गावकरी मोठ्या अभिमानाने सांगतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत गावागावात शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून मतद
 

Web Title: 'Never had toilets at home, now built 484 toilets in town, story of a osmanabad farmer boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.