मतदार नोंदणीसाठी दिली खोटी कागदपत्रे; तुळजापुरात दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 04:49 PM2018-02-10T16:49:26+5:302018-02-10T16:50:24+5:30

मतदार नोंदणीसाठी खोटे कागदपत्र देऊन फसवणूक केल्याची घटना तुळजापुरात घडली आहे़ याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी (दि. ९ ) दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

False documents given for voter registration; In Tuljapur, the accused filed for two | मतदार नोंदणीसाठी दिली खोटी कागदपत्रे; तुळजापुरात दोघांवर गुन्हा दाखल

मतदार नोंदणीसाठी दिली खोटी कागदपत्रे; तुळजापुरात दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

तुळजापूर (उस्मानाबाद) : मतदार नोंदणीसाठी खोटे कागदपत्र देऊन फसवणूक केल्याची घटना तुळजापुरात घडली आहे़ याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी (दि. ९ ) दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

या बाबत अधिक माहिती अशी कि, तुळजापूर येथील सूरज जगदाळे, प्रसाद सतीश उंडरे यांनी मतदार नोंदणीसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रात फेरबदल केल्याचे उघडकीस आले आहे़ या दोघांनी खोट्या कागदपत्रे तयार केली, त्यावर बनावट शिक्के मारून सत्यप्रत करीत ती कागदपत्रे खरी असल्याचे प्रशासनास भासविले. याचा वापर मतदार नोंदणीसाठी केला़ ही बाब लक्षात आल्यानंतर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार निश्वरामा रामराव सूर्यवंशी यांनी सूरज व प्रसाद विरुद्ध तुळजापूर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध कलम ३१ लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: False documents given for voter registration; In Tuljapur, the accused filed for two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.