Dhunda from the village of Chutti, the protagonist of the army, accused of defamation; The incident in Osmanabad | बदनामी केल्याचा आरोप करत सैन्यातील पुतण्याने काढली चुलतीची गावातून धिंड; उस्मानाबाद येथील घटना

ठळक मुद्देपीडित महिला तिच्या पुतण्याच्या घरातील महिलेची समाजात बदनामी करीत असल्याचा आरोप सैैन्यदलात जवान म्हणून कर्तव्यावर असलेल्या पुतण्याने शुक्रवारी तिला मारहाण केली़ जबर मारहाण केल्यानंतर चपलांचा हार पीडित महिलेच्या गळ्यात बांधून तिची गावातून जवळपास ५०० मीटर अंतर चालवीत धिंड काढली़

उस्मानाबाद : आपल्या घरातील महिलांची बदनामी करीत असल्याचा आरोप करीत सुटीवर आलेल्या सैन्यदलातील पुतण्यानेच आपल्या ५५ वर्षीय चुलतीची गावातून धिंड काढल्याची घटना आलूर येथे घडली आहे़ याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा मुरुम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उमरगा तालुक्यातील आलूर येथे वास्तव्यास असलेली पीडित महिला तिच्या पुतण्याच्या घरातील महिलेची समाजात बदनामी करीत असल्याचा आरोप करीत सैैन्यदलात जवान म्हणून कर्तव्यावर असलेल्या पुतण्याने शुक्रवारी तिला मारहाण केली़ जबर मारहाण केल्यानंतर चपलांचा हार पीडित महिलेच्या गळ्यात बांधून तिची गावातून जवळपास ५०० मीटर अंतर चालवीत धिंड काढली़ हा प्रकार थांबविण्यासाठी गावातील काही नागरिकांनी सुरुवातीला प्रयत्न केले़ मात्र, आरोपी त्यांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांचा नाईलाज झाला़ यानंतर गावातील काही प्रमुख मंडळींनी एकत्र येवून त्याची समजूत काढत हा प्रकार थांबविला़ दरम्यान, ती माहिला मारहाणीत जखमी झाल्याने तिला उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ तिच्या जबाबावरुन मुरुम पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी पुतण्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 


कमांडिंग आॅफिसरला दिला अहवाल : पोलीस अधीक्षक

आरोपी हा सैैन्यदलात कार्यरत आहे़ त्याच्यासह अन्य तिघांवर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुख्य आरोपी जवानास अटकही करण्यात आली आहे़ याप्रकरणाचा अहवाल आरोपीच्या कमांडिंग आॅफिसरला पाठविण्यात आल्याचे उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले़


Web Title: Dhunda from the village of Chutti, the protagonist of the army, accused of defamation; The incident in Osmanabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.