'हे' आहे जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी पाहिलं कामकाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:01 PM2018-08-09T16:01:09+5:302018-08-09T16:05:06+5:30

आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या हॉटेलबाबत आणि त्याच हॉटेलच्या खासियतबाबत सांगणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कि जगातलं सर्वात जुनं हॉटेल अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असेल पण तसं नाहीये. हे हॉटेल जपानमध्ये आहे. 

World oldest hotel Nishiyama Onsen Keiunkan in Japan | 'हे' आहे जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी पाहिलं कामकाज!

'हे' आहे जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी पाहिलं कामकाज!

googlenewsNext

(Image Credit : hiddenhistoryofbusiness.com)

तुम्ही कधी कुठे फिरायला गेला तर एखाद्या हॉटेलमध्ये थांबले असालच. त्या हॉटेलच्या खासियतही तुम्हाला लक्षात असतील. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या हॉटेलबाबत आणि त्याच हॉटेलच्या खासियतबाबत सांगणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कि जगातलं सर्वात जुनं हॉटेल अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असेल पण तसं नाहीये. हे हॉटेल जपानमध्ये आहे. 

(Image Credit : www.a-hotel.com)

जपानमधील या हॉटेलचं नाव आहे Nishiyama Onsen Keiunkan आणि हे हॉटेल इ.स. ७०५ मध्ये तयार करण्यात आलं होतं. जपानमधील यामानाशीमध्ये हे जगातलं सर्वात जुनं हॉटेल आहे. २०११ मध्ये या हॉटेलचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जुन्या हॉटेल्सच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर नोंदवण्यात आलंय.  

महत्वाची बाब म्हणजे या हॉटेलच्या मालकाच्या ५२ पिढ्यांनी हे हॉटेल सांभाळलं आहे. म्हणजे या हॉटेलचे ५२ वंशज होते. १९९७ मध्ये हे हॉटेल रिनोवेट करण्यात आलंय. या हॉटेलच्या खोल्यांची संख्या ३७ आहे. विकीपिडीयाच्या माहितीनुसार, रेनोवेट केल्यावर खोल्यांची संख्या ३५ वरुन ३७ करण्यात आलीये.

या ऐतिहासिक हॉटेलची खासियत म्हणजे यात  गरम पाण्यांचे ६ पूल आहेत. या पूल्सना फार महत्व आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी इथे योद्धे युद्धावरुन परतताना येत असत. आणि या पूलमधील गरम पाण्याने ते आपला थकवा दूर करत असत.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या हॉटेलमध्ये तुम्ही शूज घालून जाऊ शकत नाहीत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इथे राहत असताना तुम्हाला केवळ पारंपारिक कपडे परिधान करावे लागतात.
 

Web Title: World oldest hotel Nishiyama Onsen Keiunkan in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.