नैसर्गिक सौंदर्य आणि वेगवेगळे प्राणी बघण्यासाठी खास ठिकाण नंदा देवी नॅशनल पार्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:55 PM2019-01-23T12:55:19+5:302019-01-23T13:00:39+5:30

तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल तर उत्तराखंडमधील नंदा देवी नॅशनल पार्कला भेट द्या.

Visit Nanda Devi National Park In Uttrakhand | नैसर्गिक सौंदर्य आणि वेगवेगळे प्राणी बघण्यासाठी खास ठिकाण नंदा देवी नॅशनल पार्क!

नैसर्गिक सौंदर्य आणि वेगवेगळे प्राणी बघण्यासाठी खास ठिकाण नंदा देवी नॅशनल पार्क!

googlenewsNext

(Image Credit : Tour My India)

कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते. हिरवीगार आणि घनदाट झाडी, खळखळून वाहणारी नदी, वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी-प्राणी आणि शांतताच शांतता असं नॅशनल पार्कचं चित्र असतं. तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल तर उत्तराखंडमधील नंदा देवी नॅशनल पार्कला भेट द्या. सुंदर नजाऱ्यांसोबतच तुम्ही इथे अस्वल, हिरण यांसारखे प्राणीही बघू शकता. इतकेच नाही तर इथे अनेक दुर्मिळ वनस्पतीही बघायला मिळतात. 

शानदार डोंगर, चारही बाजूने पसरलेली हिरवळ आणि त्यावर फिरताना दिसणारे जीव-जंतू असा इथला नजारा असतो. नंदा देवी नॅशनल पार्कमध्ये ब्रम्ह कमल आणि भरल(जंगली बकरी) या पार्कची शोभा वाढवतात. समुद्र सपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेल्या नंदा देवी नॅशनल पार्क हा जवळपास 630.33 वर्ग किमी परिसरात पसरलेला आहे. उत्तर भारतातील हे सर्वात मोठा नॅशनल पार्क आहे. 

यूनेस्कोच्या यादीत समावेश

१९३९ मध्ये नंदा देवीला नंदा देवी सॅंक्चुअरीचा दर्जा मिळाला. ६३० स्क्वेअर किमीमध्ये पसरलेला हा पार्क १९८२ मध्ये नंदा देवी नॅशनल पार्क झाला. आणि १९८८ मध्ये यूनेस्कोने याचा वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीत समावेश केला. 

नंदा देवी नॅशनल पार्कची खासियत

कस्तुरी मृग, मेनलॅंड सीरो, लाल लोमडी(कुत्र्याचा एक प्रकार) आणि हिमायलन ताहर बघायला मिळतात. त्यासोबतच स्नो लॅपर्ड, माकडे यांच्यासोबतच काळे अस्वलही बघायला मिळतात. १९९३ मध्ये इथे ११४ प्रकारचे पक्षी असल्याची नोंद केली गेली होती. ४० प्रकारची फुलपाखरे आहेत. 

दुर्मिळ वनस्पती

नंदा देवी नॅशनल पार्कमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. इथे फूलांच्या ३१२ प्रजाती आहेत. तर १७ प्रकारच्या लुप्त होत चाललेल्या वनस्पती आहेत. तसेच हे ठिकाणा भारतातील अनेक तीर्थ स्थळांपैकी एक आहे. 

नॅशनल पार्कच्या आजूबाजूची डोंगर

नंदा देवी नॅशनल पार्कच्या आजूबाजूला अनेक डोंगर बघायला मिळतात. त्यात दुनागिरी (7066 मीटर), चांगबंद (6864 मीटर), कालंका (6931 मीटर), ऋषि डोंगर (6992 मीटर), मॅगराव (6765 मीटर), नंदा खाट (6631 मीटर), मॅकतोली (6803 मीटर), मृगथुनी (6655 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), बेथारतोली हीमल (6352 मीटर) आणि पूर्वी नंदादेवी (7434 मीटर) यांचा समावेश आहे. 

इथे फिरताना घ्यायची काळजी

इथे येणाऱ्या पर्यटकांना ग्रुपने फिरण्याचीच परवानगी आहे. ज्यात ५ ते ६ लोकांचा समावेश असावा. या ग्रुपसोबत गाइड नक्कीच राहतात. १४ वर्षांवरील व्यक्ती इथे जाऊ शकतात. इथे फिरायला येण्यासाठी पूर्णपणे फिट असणे गरजेचे आहे. कारण येथील रस्ते वेडेवाकडे आणि लांब आहेत. 

कधी जाल?

नंदा देवी नॅशनल पार्क १ मे ते ३१ ऑक्टोबर म्हणजे वर्षातील केवळ ६ महिनेच उघडं असतं. यादरम्यानच तुम्ही इथे फिरण्याची मजा घेऊ शकता. तसा १५ जून ते १५ सप्टेंबर इथे जाण्यासाठी फार चांगला काळ मानला जातो. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - देहरादूनचं जॉली ग्रांट एअरपोर्ट इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं विमानतळ आहे. 

रेल्वे मार्ग - रेल्वेने इथे येण्यासाठी ऋषिकेशचं सर्वात जवळ रेल्वे स्टेशन आहे. 

रस्ते मार्ग - जोशीमठ येथून नंदा देवी नॅशनल पार्कला येण्यासाठी बसेस सुरू असतात. त्यासोबतच ऋषिकेश आणि उत्तराखंच्या इतर ठिकाणांहूनही इथे येण्याची सुविधा आहे.

Web Title: Visit Nanda Devi National Park In Uttrakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.