अॅडव्हेंचरचा खरा आनंद घ्यायचा असेल तर भेट द्या कनातलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:43 PM2018-09-10T16:43:49+5:302018-09-10T16:46:42+5:30

जर निसर्गाचं सौदर्य जवळून बघायचं असेल तर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवणं गरजेचं आहे. अशावेळी सर्वांनाच हिल स्टेशन आठवतात.

Visit Kanatal in Uttarakhand for camping and adventure | अॅडव्हेंचरचा खरा आनंद घ्यायचा असेल तर भेट द्या कनातलला!

अॅडव्हेंचरचा खरा आनंद घ्यायचा असेल तर भेट द्या कनातलला!

Next

जर निसर्गाचं सौदर्य जवळून बघायचं असेल तर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवणं गरजेचं आहे. अशावेळी सर्वांनाच हिल स्टेशन आठवतात. भारतात तसे तर अनेक हिल्स स्टेशन आहेत, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा हिल स्टेशनबाबत सांगणार आहोत जे आपल्या सुंदरतेसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हे हिल स्टेशन आहे उत्तराखंडमधील कनातल.

मसूरी-चंबा हायवेला आहे कनातल

या छोट्या हिल स्टेशनला कनातल असं नाव आहे. हे हिल स्टेशन मसूरी-चंबा हायवेवर आहे. आणि दिल्लीपासून साधारण ३०० किमी दूर आहे. समुद्रापासून ८ हजार फूट उंचीवर स्थित कनातल एक रोमॅंटिक आणि शातिंपूर्ण ट्रिपसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन आहे. 

काय आहे खास? 

कनातलमध्ये बघण्यासाठी खूप ठिकाणे आहेत. येथील सर्कुंडा देवी मंदिर फार प्रसिद्ध असून हे मंदिर देवी सतीला समर्पित आहे. यासोबतच येथील कोडाई जंगलात ट्रेकिंग आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला जाऊ शकतो. 

कॅम्पिंगसाठी खास जागा

अॅडव्हेंचरसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. हे ठिकाणा कॅम्पिंगसाठी खासकरुन प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला या ट्रिपला नेहमीसाठी यादगार करायचं असेल तर इथे आवर्जून या. 

कनातल जाण्याची परफेक्ट वेळ

गरमीच्या दिवसात कनातलचं तापमान १० ते २० डिग्री आणि हिवाळ्यात ५ ते १० डिग्री असतं. हिवाळ्यात इथे बर्फवृष्टी होत असल्याने अडचणी येतात. रस्ते बंद होतात. कनातलमधील वातावरण नेहमीच चांगलं राहतं. त्यामुळे इथे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी वेगवेगळ्या अॅक्टीव्हिटीज चालतात.

कसे पोहोचाल?

नवी दिल्ली ते कनातलचं अंतर साधारण ३०२ किमी आहे. यापासून जवळचं एअरपोर्ट देहरादून येथील जॉली ग्रांन्ट एअरपोर्ट आहे. बसने जायचं असेल तर दिल्लीहून कनातलसाठी बस जाते. कनातलला रेल्वेने जाण्यासाठी जवळील ऋषिकेश आणि देहरादून स्टेशन आहे. या ठिकाणांहून कनातलला जाण्यासाठी २ ते ३ तासांचा वेळ लागतो.
 

Web Title: Visit Kanatal in Uttarakhand for camping and adventure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन