सुट्टीत काही वेगळं आणि रोमांचक करायचं असेल 'हे' ठिकाण ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:39 AM2019-05-21T11:39:34+5:302019-05-21T11:47:14+5:30

असे फार कमी डेस्टिनेशन असतात जे उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट असतात.

Summer adventure activities to do in Solang Valley | सुट्टीत काही वेगळं आणि रोमांचक करायचं असेल 'हे' ठिकाण ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

सुट्टीत काही वेगळं आणि रोमांचक करायचं असेल 'हे' ठिकाण ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

googlenewsNext

(Image Credit : TravelTriangle)

असे फार कमी डेस्टिनेशन असतात जे उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट असतात. भारतात अशा डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये सोलंगचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटक इथे पॅराग्लायडींग, जॉर्बिंग आणि नेचर वॉकचा आनंद घेतात. तर हिवाळ्यात इथे स्कीइंग आणि स्नोफॉलचा आनंद घेता येतो. चला जाणून घेऊ सुट्टी पुरेपूर आनंद घेण्यासाठी इथे तुम्ही कोणकोणत्या अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता. 

पॅराग्लायडींग

मनालीपासून १४ किमी अंतरावर रोहतांग रस्त्यावर आणि व्यास नदीजवळ सोलंग घाट आहे. अ‍ॅडव्हेंचर टुरिज्मची आवड जास्त असणाऱ्या लोकांकडून या ठिकाणाचं नाव अधिक ऐकायला मिळतं. पॅराग्लायडींगदरम्यान तुम्ही इथे वेगवेगळे सुंदर नजारे बघू शकता आणि या अ‍ॅक्टिव्हिटीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. पॅराग्लायडींगसाठी इथे दोन बेस्ट जम्प स्टेशन आहेत. एका थोडा खाली आहे तर दुसरा फार उंचीवर. 

गोंडोला किंवा सोलंग व्हॅलीमध्ये रोप-वे

(Image Credit : skihimalayas.net)

रोप-वे ची सवारी करत उंचीवरून घाटाची सुंदर डोळ्यात भरून घेण्यात बातच वेगळी आहे. याचा अनुभव तुम्ही सोलंगमध्ये फारच चांगल्याप्रकारे घेऊ शकता. इथे पॅराग्लायडींगच्या हाय जम्प स्टेशनवर पोहोचताना सोलंग रोप-वे ची सवारी केली जाऊ शकते. 

झॉर्बिंग

(Image Credit : Pinterest)

झॉर्बिंग एक अनोखी अ‍ॅक्टिव्हिटी आहे. यात तुम्हाला पारदर्शी फुग्यामध्ये बंद केलं जातं. यातून तुम्ही सहजपणे बाहेरचं सगळंकाही बघू शकता. या फुग्यामध्ये तुम्हाला बेल्टने बांधलं जातं आणि उंचीवरून हा फुगा गवताच्या मैदानात ढकलून दिला जातो. त्यामुळे ही एक फारच रोमांचक आणि अनोखी अ‍ॅक्टिव्हिटी ठरते. 

क्वाड मोटर सायकलिंग

(Image Credit ; Terrain Travellers)

सोलंगमध्ये ऑल-टेरेन व्हेईकल किंवा एटीवीची सवारी करणे फारच रोमांचक अनुभव ठरेल. जर तुम्हाला चांगल्याप्रकारे बाइक चालवता येत असेल तर तुम्ही एका प्रशिक्षित ड्रायव्हरसोबत याचा अ‍ॅक्टिव्हिटीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. सामान्यपणे यात तीन चाकी आणि चार चाकी वाहने असतात. याद्वारे डोंगराळ भागात सवारी करणे नक्कीच एक वेगळा अनुभव ठरू शकतो. 

कॅम्पिंग

डोंगरात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलात आणि कॅंपिंग केलं नाही तर तुमची ट्रिप अर्धवट राहू शकते. हिरवंगार गवत आणि स्वच्छ मैदानात तंबू लावून त्यात राहण्यात एक वेगळीच मजा आहे. यादरम्यान कॅम्प फायर, लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स आणि सोबत चवदार पदार्थांचा आनंद घेऊ शकता. 

Web Title: Summer adventure activities to do in Solang Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.