पहिल्यांदाच गोव्याला फिरायला जाताय मग हे लक्षात ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:29 PM2017-10-28T16:29:08+5:302017-10-28T16:43:25+5:30

गोव्याला जाण्याची तुमची पहिलीचे वेळ असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अफाट मस्तीनं भरलेल्या या शहरात फिरताना काही गोष्टींची काळजी घेतली तर गोव्यात फिरण्याचा आणि मौजमजा करण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

Remember this for the first time in Goa! | पहिल्यांदाच गोव्याला फिरायला जाताय मग हे लक्षात ठेवा!

पहिल्यांदाच गोव्याला फिरायला जाताय मग हे लक्षात ठेवा!

googlenewsNext

- अमृता कदम


भारतीय आणि परदेशी पर्यटकांमध्ये गोव्याची काय क्रेझ आहे, हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. केवळ युवा वर्गासाठीच नाही तर फॅमिली ट्रीपसाठीही गोवा हे पर्यटकांचं अगदी आवडतं ठिकाण आहे. गोव्याला अगदी वारंवार फिरायला जाणा-या पर्यटकांची संख्याही काही कमी नाही. पण गोव्याला जाण्याची तुमची पहिलीचे वेळ असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अफाट मस्तीनं भरलेल्या या शहरात फिरताना काही गोष्टींची काळजी घेतली तर गोव्यात फिरण्याचा आणि मौजमजा करण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

 


सनस्क्रीन विसरु नका
गोव्याच्या बीचवर मस्ती करण्याचा विचार असेल तर सनस्क्रीन ही तुमच्या सामानातली अत्यावश्यक गोष्ट आहे. सामान पॅक करताना चांगल्या प्रतीचं, योग्य एसपीएफ असलेलं सनस्क्रीन घ्यायचं विसरलात तर आठवणीनं तिथल्या एखाद्या मेडिकल स्टोअरमधून खरेदी करा. त्यामुळे गोव्यात जावून त्वचा खराब झाली असं होणार नाही.

टोपी आणि सनग्लासेस

गोव्यात फिरताना डोक्यावर रंगीबेरंगी टोपी किंवा हॅट आणि डोळ्याला फॅशनेबल गॉगल नसेल तर तुमच्या ट्रिपमध्ये काहीतरी कमतरता राहिलीये असं समजा. या गोष्टी अगदी सोबत घेऊन नाही गेला तरी चालेल, पण तिथे तात्पुरत्या स्वरूपात का होईना स्ट्रीट शॉपिंग करा. पण या गोष्टी अवश्य घ्या. त्यामुळे गोव्यात गेल्याचा मूड क्रिएट होइल आणि उन्हापासून संरक्षणही मिळेल.
 

कपडे आणि शूज
गोव्यात गारठा आणि ऊन या दोन्ही गोष्टींचा त्रास एकाचवेळी होऊ शकतो. या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला कम्फर्टेबल ठेवतील असेच कपडे सोबत ठेवा. तुमचे शूजही तुमच्या लुकला साजेसेच असू द्या. गोव्यातले अनेक मुख्य रस्ते, फूटपाथ हे गुळगुळीत आहेत. त्यामुळे अगदी सपाट शूज घेऊन जावू नका.
 

कृत्रिम दागिन्यांचा पर्याय उत्तम
गोव्यासारख्या देशी-विदेशी पर्यटकांची कायम गर्दी असलेल्या ठिकाणी कितीही हौस असली तरी सोन्याचांदीच्या दागिन्यांचा मोह टाळा. कमी वजनाच्या किंवा कृत्रिम दागिन्यांचा पर्याय सर्वोत्तम आहे. त्यामुळे तुम्ही निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

 


 

रोख पैशांऐवजी कार्डचा पर्याय

दागिन्यांप्रमाणेच अधिक प्रमाणात रोख पैसेही स्वत:सोबत ठेवू नका. त्याऐवजी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणं फायद्याचं ठरत. काही कारणानं कार्ड हरवलं, गहाळ झालं तरी ते ब्लॉक करण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो.
 

एनर्जी ड्रिंक आणि मेडिकल किट
गोव्यामधल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये जर तुम्ही फिरायला जाणार असाल तर सोबत नेहमी लिंबूपाणी किंवा एखादं एनर्जी ड्रिंक असू द्या. त्यामुळे तुमच्या शरीरातल्या ऊर्जेची हानी वेगानं भरु न निघण्यास मदत होते. शिवाय खबरदारी म्हणून मेडिकल किटही सोबत असलेलंही उत्तम.
 

ड्रिंक्सची मजा पण मर्यादेतच
गोवा प्रसिद्ध आहे तो तिथल्या मोकळ्या संस्कृतीसाठी आणि ड्रिंक्ससाठी. त्यातही गोव्याची फेणी आणि युरैक पर्यटकांमध्ये प्रिय आहे. पण ती केवळ मर्यादेतच घेतलेली चांगली. कारण ओव्हरडोस झाला तर तुमची ट्रिप खराब होऊ शकते.
 

लाईफगार्डच्या सूचना काळजीपूर्वक ऐका

गोवा म्हणजे मौजमजा. त्यामुळे बीचवर हवी तितकी मस्ती करा. मात्र ती करताना बीचवरच्या सुरक्षारक्षकांच्या सूचनांकडे कानाडोळा करु नका. भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अंदाज असल्यानं ते ब-याचदा खोल समुद्रात न उतरण्याचा सल्ला देतात. त्यांचं म्हणणं हे आपल्याच सुरक्षेसाठी आहे हे लक्षात घ्या आणि त्यांच्या सूचनांचं पालन करा.

 


 

सुरक्षेशी तडजोड करु नका
गोव्याची ट्रीप आयुष्यभर लक्षात ठेवायचं म्हणजे फोटो आणि सेल्फी पाहिजेच. त्यामुळे सेल्फी स्टिकही सोबत असू द्या. पण सेल्फी काढताना धोकादायक ठिकाणं टाळा. त्यासोबतच हॉटेलमधून बाहेर पडताना, आपली रु म व्यवस्थित लॉक आहे की नाही याची खात्री करु नच बाहेर पडा. रात्री-अपरात्री अनोळखी रस्त्यांवरु न भटकू नका.

 

Web Title: Remember this for the first time in Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.