मुंबईतील अशी ठिकाणं जिथे पैशांविना मिळवा आनंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 05:30 PM2018-04-05T17:30:30+5:302018-04-05T17:30:30+5:30

पैशांचा जास्त खर्च न होताही पार्टनरसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी काही खास जागा मुंबईत आहेत. त्या कोणत्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

pocket friendly places in mumbai | मुंबईतील अशी ठिकाणं जिथे पैशांविना मिळवा आनंद  

मुंबईतील अशी ठिकाणं जिथे पैशांविना मिळवा आनंद  

Next

मुंबईत कपल किंवा मित्रांचा ग्रुप नेहमी कुठे भेटायचं या प्रश्नावर अडकलेले बघायला मिळतात. कारण त्याच त्या जागेंवर जाऊन ते कंटाळलेले असतात. अशात दुसरी अडचण पैशांचीही असतेच. पण पैशांचा जास्त खर्च न होताही पार्टनरसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी काही खास जागा मुंबईत आहेत. त्या कोणत्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

१) कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवेवर असणारी शॉपिंग स्ट्रीट ही शॉपींगच्या शौकीनांसाठी खास जागा. या ठिकाणी फक्त फेरफटका जरी मारला तरी त्याचा आनंद लुटू शकतो. आणि या ठिकाणी तुम्ही फ्रेंड्ससोबत आलात तर मग सोने पे सुहागा...

२) मरिन ड्राईव्ह

साऊथ मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशी जागा म्हणजे मरिन ड्राईव्ह. ही जागा कॉलेजिअन्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी अनेक हौसी फोटोग्राफर्स, डुडलर्स, डे ड्रिमर पाहायला मिळतात.

३) गीरगाव चौपाटी

तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत इथून डोळ्याचे पारणे फेडणारा सूर्यास्त पाहू शकता. एकाबाजूला उंच उंच इमारती आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असं हे ठिकाणं. एका जागेवर बसून आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही इथे तासन् तास गप्पा मारू शकता.

४) वरळी सिफेस

मुंबईतील आणखी एक चिल स्पॉट म्हणजे वरळी सिफेस. या ठिकाणी तुम्ही दिवस-रात्र कधीही बसणं पसंद करू शकता. या ठिकाणी दोन्ही वेळेला एक वेगळा आनंद तुम्ही अनुभवू शकता. हे ठिकाण इतकं सेफ आहे की, तुम्ही मध्यरात्री देखील प्रवास करू शकता.

५) शिवाजी पार्क

शिवाजी पार्क माहित नाही अशी एकही व्यक्ती मुंबईत मिळणार नाही. अगदी खेळांपासून राजकारणापर्यंत साऱ्यांनीच या शिवाजी पार्कला गाजवलं आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी निवांत गप्पा मारत बसू शकता.

६) दादर चौपाटी

प्रभादेवी बिच ही अतिशय सुंदर जागा आहे. समुद्राच्या लाटा, शांत जागा, सूर्यास्त आणि अतिशय सुंदर निसर्ग असा हा परिसर आहे. इथेही तुम्हाला आनंद येईल.

७) बँडस्टँड

एका बाजूला उंचच उंच इमारती आणि समोर खवळणारा समुद्र हे चित्र म्हणजे बँडस्टँड. कलाकारांच्या मांदियाळीने भरलेली ही जागा तुम्हाला एका स्वप्ननगरीच वाटेल. 

८) कार्टर रोड

बँडस्टँड शेजारीच हा कार्टर रोडचा परिसर आहे. भव्य इमारती आणि माणसांचा वर्दळ असलेला ही जागा तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल.

९) हिरानंदानी गार्डन

ही जागा वसली आहे एका मुंबईच्या अशा भागात जे तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. या ठिकाणी अनेक पार्क आहेत जसे की निर्वाणा पार्क, मेसमरिंग फॉरेस्ट पार्क आणि डॉग पार्क अशा खास गोष्टी आहेत.

१०) जुहू बिच

मनमोकळा समुद्र आणि दूरवर पसरलेली वाळू ही तुम्हाला एक वेगळीच मजा देणार आहे.
 

Web Title: pocket friendly places in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई