हिमाचल प्रदेशातील बीर गाव तुम्हाला घेवून जातं तुमच्या स्वप्नातल्या गावात. पावसाळ्यात हे गाव चुकवू नकाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:22 PM2017-07-26T18:22:00+5:302017-07-26T18:29:51+5:30

पाच हजार फूट उंचावर वसलेलं बीर गाव. शहरातल्या धकाधकीपासून दूर जाऊन मान्सूनचा आनंद घेण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे.

Never miss experience of beer in himachal pradesh during this mansoon | हिमाचल प्रदेशातील बीर गाव तुम्हाला घेवून जातं तुमच्या स्वप्नातल्या गावात. पावसाळ्यात हे गाव चुकवू नकाच!

हिमाचल प्रदेशातील बीर गाव तुम्हाला घेवून जातं तुमच्या स्वप्नातल्या गावात. पावसाळ्यात हे गाव चुकवू नकाच!

Next
ठळक मुद्दे* हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यातलं तिबेटी निर्वासितांच छोटंसं गाव ‘बीर’.* बीरमध्ये केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर अध्यात्मिक शांतीही मिळते. या गावात एक नाही तर पाच बौद्ध विहार आहेत.* बीरमधलं तिबेटीयन खाणं तिथल्या संस्कृतीची ओळख सांगणार आणि अगदी घरगुती चवीचं.



- अमृता कदम

सकाळी उठल्यावर खिडकीचा पडदा सरकवल्यावर समोर दिसणाºया हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा, हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर झुकलेले काळे ढग आणि अनपेक्षितपणे तुमच्या चेहर्यावर उडालेले पावसाचे थेंब. स्वप्नातलं वाटावं असं हे दृश्य आहे ना? पण हे स्वप्न तुम्ही वास्तवात अनुभवू शकता.

 

 

हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यातलं तिबेटी निर्वासितांच छोटंसं गाव ‘बीर’. हे गाव तुम्हाला ‘सपनों के देस’ मध्ये घेवून जातं. पाच हजार फूट उंचावर वसलेलं हे गाव शहरातल्या धकाधकीपासून दूर जाऊन मान्सूनचा आनंद घेण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे. सगळ्या कृत्रिमतेपासून एकदम अस्पिर्शत असं हे गाव आहे. 

सकाळी उठल्यावर आणि स्प्रूसच्या वृक्षांमधून सळसळणार्या  वार्यासोबतच पक्षांचा किलबिलाट तुम्हाला प्रसन्न करतो. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर मातीचा मंद सुगंध परत एकदा आपल्याला मातीशी जोडतो.
बीरमध्ये केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर अध्यात्मिक शांतीही मिळते. या गावात एक नाही तर पाच बौद्ध विहार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली आणि या विहारांमधली सुंदर पेंटिग्ज पहायची असतील तर या विहारांना भेट दिलीच पाहिजे. बीरपासून 11 किलोमीटर अंतरावर पालपंग शेब्लिंग विहारही आवर्जून पाहण्यासारखा आहे.


खरंतर बीर हे पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये पॅराग्लायडिंग पूर्णपणे बंद असतं. पण पॅराग्लायडिंंगसाठी ओळखल्या जाणार्या बिलिंगला मात्र नक्की जा. कारण इथल्या उंचावरु न संपूर्ण कांग्रा व्हॅलीचं दर्शन होतं. हे दृश्य तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतं.
संध्याकाळी या ठिकाणी आकाशात रंगांची उधळण होते. पाऊस थांबल्यावर आकाश स्वच्छ निळं होतं. आणि सूर्य मावळताना गुलाबी-तपकिरी रंगाच्या छटा आकाशात पसरतात. आणि सरतेशेवटी काळ्या आकाशात चमकणारे तारे !

बीरमधली अजून एक गोष्ट आहे जिचा उल्लेख करायलाच हवा ते म्हणजे इथलं खाणं-पिणं. इथे अत्यंत रु चकर आणि पारंपरिक पद्धतीचं तिबेटीयन खाणं मिळतं. उंची, महागड्या रेस्टॉरण्टपेक्षा जर तुम्हाला साधं, पण तिथल्या संस्कृतीची ओळख सांगणारं, घरगुती पद्धतीचं जेवण आवडत असेल तर बीर तुम्हाला निराश नाही करणार. इथले स्थानिक लोक तुमच्या आदरितथ्यासाठी उत्सुक असतात. नूडल्स घालून केलेलं ‘थेंथुक’ नावाचं सूप पावसात भिजून आल्यावर आतून-बाहेरु न ऊबदार करेल. राइस आणि नूडल्सऐवजी तिंग्मो नावाचा स्टीम्ड बन तुम्ही कोणत्याही मेन कोर्ससोबत मागवू शकता. इतरही अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा आस्वाद तुम्ही बीरमध्येच घेऊ शकता.

अजूनही मान्सूनचा दीड महिना मुक्काम आहे. तोपर्यंत एकदा आवर्जून हिमाचल प्रदेशमधल्या या गावाला जाऊन या. इथले चार-पाच दिवस तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांसाठी भरपूर ऊर्जा देतील हे नक्की!

Web Title: Never miss experience of beer in himachal pradesh during this mansoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.