अविस्मरणीय आणि भन्नाट अनुभवासाठी भेट द्या लाहोल-स्पीतिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:54 PM2019-05-10T13:54:37+5:302019-05-10T14:10:48+5:30

मे आणि जूनमध्ये आग ओकणाऱ्या सूर्याला टाळायचं असेल आणि वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठी स्पीति हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.

Lahaul Spiti best place to visit in summer | अविस्मरणीय आणि भन्नाट अनुभवासाठी भेट द्या लाहोल-स्पीतिला!

अविस्मरणीय आणि भन्नाट अनुभवासाठी भेट द्या लाहोल-स्पीतिला!

Next

मे आणि जूनमध्ये आग ओकणाऱ्या सूर्याला टाळायचं असेल आणि वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठी स्पीति हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. इथे एप्रिल-मे मध्येच नाही तर वर्षातील ६ महिने बर्फाची जाड चादर पसरलेली असते. हा नजारा इतका सुंदर असतो की, रोमान्स आणि अॅडव्हेंचरसोबतच हे ठिकाण धर्म-आध्यात्माच्या दृष्टीनेही बेस्ट आहे. चला जाणून घेऊ येथील ट्रिप पैसा वसूल कशी ठरेल. 

१०व्या शतकातील त्रिलोकीनाथ मंदिर

(Image Credit : Tripoto)

हे मंदिर १०व्या शतकात तयार करण्यात आलं होतं. २००२ मध्ये मंदिर परिसरात आढळलेल्या शिलालेखांमधून याचा खुलासा झाला. केलंग या शहरापासून ४५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. त्रिलोकीनाथ मंदिराचं प्राचीन नाव टुंडा विहार आहे. शिलालेखात उल्लेख करण्यात आला आहे की, हे मंदिर दवनज राणा यांनी बांधलं होतं. हे त्रिलोकीनाथ गावातील राणा ठाकूरच्या पूर्वजांचे प्रिय होते. 

नीलकंठ तलाव

(Image Credit : Tripoto)

इथे महिलांना जाता येत नाहीत. हा तलाव पटन घाटाच्या नॅनगारमध्ये स्थित आहे. नीलकंठ महादेव नावानुसारच हा तलाव निळ्या रंगाचा आहे. हा तलाव ४५०० मीटर उंचीवर स्थित आहे. या ठिकाणावर दूरदूरून लोक ट्रेकिंग करण्यासाठी येतात. नॅनगारपासून जवळपास १२ किमी पायी चालत यावं लागतं. पण या ठिकाणी केवळ पुरूषच जाऊ शकतात.महिलांना बंदी का आहे याचं कारण स्पष्ट नाही. 

चंद्रताल बघणे विसरू नका

(Image Credit : Holidify)

स्पीति घाटात १४,१०० फूट उंचीवर असलेल्या ऐतिहासिक चंद्रताल तलावाचं वेगळं महत्त्व आहे. जर तुम्ही मनालीहून स्पीतिला जात असाल तर कुंजुमहून तुम्ही चंद्रतालला पोहोचू शकता. चंद्रताल तलावा हा फारच अनोखा आहे. येथूनच चंद्रा नदीचा उगम होतो. तीच पुढे जाऊन चिनाब नदी होते. 

आराध्य देव राजा घेपन मंदिर

(Image Credit : jagran.com)

लाहुल-स्पीतिचे राजा मानले जाणारे राजा घेपन यांचं हे मंदिर मनाली-केलंग मार्गावर सिस्सूमध्ये स्थित आहे. केलंग जाणारा प्रत्येक पर्यटक इथे थांबतो. अशी मान्यता आहे की, प्रत्येक तिसऱ्या वर्षी राजा घेपन लाहुल घाटाच्या परिक्रमेसाठी निघतात आणि स्थानिकांना आशीर्वाद देतात. 

ताबो मठ आहे खास

समुद्र सपाटीपासून ३०५० मीटप उंचीवर असलेला ताबो मठ काजापासून ४० किमी अंतरावर आहे. दूरकाजा-किन्नोर मार्गावर हा मठ आहे. हा मठ हिमाचलमधील सर्वात महत्त्वपूर्ण मठ मानला जातो. या मठाची निर्मिती ९९६ इ. मध्ये करण्यात आली होती. 

किब्बरच्या प्रेमात पडाल

गोम्पाओं आणि मठांच्या या परिसरात निसर्गाची वेगवेगळी रूपे बघायला मिळतात. किब्बर गावात पोहोचून असं वाटतं की, तुम्ही आकाशाजवळ पोहोचले आहात. काजापासून १२ किलोमीटर संपर्काच्या मार्गापासून किब्बरपर्यंत पोहोचता येतं. 

सुंदर पिन व्हॅली

स्पीतिची पिन व्हॅली हिमालयातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. ट्रेकिंगची आवड असणारे इथे अधिक येतात. तसेच येथील जंगलांमध्ये वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात.  

ग्यू गावात ५५० वर्ष जुना रहस्यमयी ममी

(Image Credit : TripAdvisor)

चीनच्या सीमेवर असलेलं ग्यू गाव नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. इथे ५५० वर्ष जुनी ममी आजही रहस्य बनून आहे. असे म्हटले जाते की, १९९३ मध्ये जेव्हा ही ममी मिळाली होती, तेव्हा डोक्यावर उपकरण लागल्याने रक्त निघत होतं. गावातील लोकांनी यासाठी मदिंर तयार केलंय. अशी मान्यता आहे की, ही ममी ५५० वर्ष जुनी आहे. 

कसे पोहोचाल?

हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात मनालीपासून ते रोहतांग व कोकसरहून लाहुलचा पोहोचता येतं. मनालीपासून केलंगचं अंतर ११० किमी आहे. उन्हाळ्यात शिमला ते किन्नोरहून स्पीति घाटात आणि कुंजर दर्जेला भेट देऊन तुम्ही लाहुला पोहोचू शकता. 

Web Title: Lahaul Spiti best place to visit in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.