उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ऑप्शन शोधताय?; कलिम्पोंग ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:26 PM2019-04-10T18:26:00+5:302019-04-10T18:27:24+5:30

उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करावी यामध्ये अनेकजण कन्फ्यूज असतात. कारण उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरायला जाणं शक्य नसतं. अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं.

Have fun at Kalimpong in summer with your friends and family | उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ऑप्शन शोधताय?; कलिम्पोंग ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ऑप्शन शोधताय?; कलिम्पोंग ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

googlenewsNext

उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करावी यामध्ये अनेकजण कन्फ्यूज असतात. कारण उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरायला जाणं शक्य नसतं. अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं. त्यामुळे तिथे जाऊन फिरणं शक्य नसतं. वातावरणातील उकाड्यामुळे फिरण्याचा पुरेपुर आनंद अनुभवता येत नाही. उकाड्याने अगदी नकोसं होतं. अशावेळी आपण हिल स्टेशनचा पर्याय निवडतो. पण नेहमीच्याच ऑप्शन्सऐवजी तुम्ही थोडासा हटके ऑप्शन शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. दररोजच्या धावपळीपासून दूर आणि शांत ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर आणि क्लासी ठिकाणाबाबत सांगणार आहोत. जिथे या उन्हाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जाऊ शकता. 

या उन्हाळ्यामध्ये नेहमीच्याच ठिकाणांना भेट देऊन कंटाळला असाल तर तुम्ही पश्चिम बंगालमधील कलिम्पोंग येथे भेट देऊ शकता. कलिम्पोंग पश्चिम बंगालमधील एक प्रचलित हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला निसर्गसौंदर्यासोबतच अनेक गोष्टींचा आस्वाद घेता येईल. 

दार्जिलिंगमध्ये असलले हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 1250 मीटर उंचावर आहे. येथील निसर्गसौंदर्यासोबतच येथील वातावरणही मन प्रसन्न करण्यासाठी मदत करतं. येथे येण्या-जाण्याच्या रस्त्यामधून प्रवासादरम्यानचं तुम्ही निसर्गसौंदर्य न्याहाळू शकता. येथील हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरांवरून उगवणाऱ्या सुर्याचं दर्शन घेण्यासोबतच आणि मावळत्या सुर्याला निरोप देण्याचा अनुभव फार सुखद असतो. तसेच या ठिकाणापासून अगदी काही अंतरावर असलेल्या सिलिगुडीलाही तुम्ही भेट देऊ शकता. 

कलिम्पोंग शहराला बौद्ध धर्माचं धार्मिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत येथील तापमान जवळपास 15 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. 

दार्जिलिंगमध्ये असलेलं कलिम्पोंग उन्हाळ्याच्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. येथे तुम्हाला फिरण्यासोबतच बौद्ध धर्म समजून घेण्याची आणि शिल्प पाहण्याची संधी मिळेल.

जर तुम्हालाही थोडं अॅडव्हेंचर आणि एकांत दोन्हींचा अनुभव घेता येईल. त्यामुळे आपल्या कुटुंबियांसोबत कलिम्पोंग येथे फिरायला जाण्याचा प्लॅन नक्की करा.

Web Title: Have fun at Kalimpong in summer with your friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.