विमान प्रवास करणार आहात? पण आधी प्रवासी म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार माहित आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 06:33 PM2017-09-21T18:33:38+5:302017-09-21T18:40:56+5:30

विमान प्रवास करताना आपल्याला प्रवासी म्हणून काही अधिकार असतात, हे ब-याच जणांना माहित नसतं. त्यामुळे ‘जाऊ द्या ना, कशाला प्रवासाचा आनंद खराब करायचा’, म्हणून आपण होणा-या गैरसोयींकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता थोडं जागरु क राहिलं, तर प्रवासाच्या आनंदासोबतच आपलं आर्थिक, मानसिक नुकसानही टळतं.

Get know your rights as air traveller before flying. | विमान प्रवास करणार आहात? पण आधी प्रवासी म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार माहित आहेत का?

विमान प्रवास करणार आहात? पण आधी प्रवासी म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार माहित आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्दे* कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही तुमचं तिकिट कॅन्सल केलंत, तर तुमचे पैसे लगेचच रिफंड होतात.* डीजीसीएच्या नियमानुसार काही तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं आणि वेळेत उड्डाण करु शकलं नाही, तर विमान कंपनीनं एक तासाच्या आत प्रवाशांची दुसरी सोय करणं बंधनकारक आहे.

 

अमृता कदम 

सणांचा मौसम सुरु झालेला आहे. सणासुदीच्या काळात लोक सुट्टया टाकून मस्तपैकी फिरायला जाण्याचं प्लॅन करत असतात. त्याचाच फायदा घेत विमान कंपन्या प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर्स, सवलती जाहीर करत असतात. पण या आॅफर्समुळं हुरळून न जाता विमान प्रवास करण्यापूर्वी एक प्रवासी म्हणून तुमचे अधिकार जाणून घ्यायला हवेत. नाहीतर सवलतींच्या नावाखाली फसगतच होण्याची शक्यता असते.

 

विमान प्रवास करण्याआधी

1. कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही तुमचं तिकिट कॅन्सल केलंत, तर तुमचे पैसे लगेचच रिफंड होतात. डीजीसीएनं (Directorate General Of Civil Aviation)  आपल्या वेबसाइटवर दिलेल्य माहितीनुसार तुम्ही जर कॅश पेमेंट केलं असेल तर तुम्हाला रिफंड लगेचच कॅशनेच मिळतो. जर तुम्ही क्रेडिट  कार्डनं पेमेंट केलं असेल तर तुमचे पैसे सात दिवसांच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून तिकिट बुक करत असाल तर या गोष्टींची माहिती आधीच घ्या. नाहीतर ट्रॅव्हल एजंट तुमची दिशाभूलही करु शकतात.

2. जास्त वजनामुळे जर कोणत्याही प्रवाशाला विमानातून उतरवायचं असेल तर त्यापूर्वी त्याची रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्या प्रवाशाला योग्य ती नुकसान भरपाईही द्यावी लागते. समजा एखाद्या प्रवाशाला काही कारणास्तव विमानात चढूच दिलं गेलं नाही तर त्यालाही भरपाई देणं विमान कंपनीवर बंधनकारक आहे. समजा विमान कंपनीनं भरपाई नाही दिली तर एका तासाच्या आत त्याची दुस-या विमानात सोय करु न देणं गरजेचं असतं.

3. डीजीसीएच्या नियमानुसार काही तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं आणि वेळेत उड्डाण करु शकलं नाही, तर विमान कंपनीनं एक तासाच्या आत प्रवाशांची दुसरी सोय करणं बंधनकारक आहे. विमान कंपनी ही सोय करु शकली नाही तर तिला तिकिटाचे पैसे परत द्यावे लागतात. ब-याच प्रवाशांना ही गोष्ट माहित नसल्यामुळे ते विमान कंपनी सांगेल त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करायला तयार होतात. जर प्रवासी दुस-या कंपनीच्या विमानातून जायच्या तयारीत असेल त्याचीही सोय त्या विमान कंपनीलाच करावी लागते.

 

 

4. तांत्रिक अडचणीमुळं विमान खराब झालं, त्याला निर्धारित वेळेपेक्षा एका तासाहून अधिक उशीर झाला आणि दुस-या विमानाची सोय होण्यासाठीही वेळ लागत असेल तर विमान कंपनीनं प्रवाशांची सोय थ्री स्टार हॉटेलमध्ये करणं गरजेचं आहे. शिवाय विमानाची सोय झाल्यानंतर प्रवाशांना हॉटेलपासून एअरपोर्टपर्यंत आणण्यासाठी वाहनाची सोयही करावी लागते.

5. वर सांगितलेल्या गोष्टीचं पालन जर एअरलाइन कंपनीनं नाही केलं तर तुम्ही डीजीसीएच्या वेबसाइटवर 24 तासांत आपली तक्रार नोंदवू शकता. त्यानंतरही जर काही कारवाई नाहीच झाली तर तुम्ही आधी एअरपोर्ट डायरेक्टरकडे लिखित किंवा एसएमएसद्वारे आपली तक्रार दाखल करु शकता.
आपल्याला प्रवासी म्हणून काही अधिकार असतात, हे ब-याच जणांना माहित नसतं. त्यामुळे ‘जाऊ द्या ना, कशाला प्रवासाचा आनंद खराब करायचा’, म्हणून आपण होणा-या गैरसोयींकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता थोडं जागरु क राहिलं, तर प्रवासाच्या आनंदासोबतच आपलं आर्थिक, मानसिक नुकसानही टळतं.

 

 

Web Title: Get know your rights as air traveller before flying.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.