-Ravindra More
दैनंदिन आयुष्यात काहीतरी बदल व्हावा म्हणून आपण एखाद्या पर्यटन स्थळी फिरायला जातो. मात्र पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल आणि फिरल्याचं समाधान हवे असेल तर एकदा तरी राष्ट्रीय उद्यानांना भेट द्यावीच. तेथील हिरवीगार झाडे, वाहणारे झरे व त्या झऱ्यातील पाण्याचा आवाज, सकाळी उठताना पक्षांची किलबिल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हवीहवीशी वाटणारी शांतता. नॅशनल पार्क किंवा अभयारण्यं आपल्या कल्पनेतलं हे चित्र खर करु शकतात. जैवविविधतेनं नटलेल्या भारतात जवळपास शंभर राष्ट्रीय उद्यानं, ४० व्याघ्र प्रकल्प आणि ४५० हून अधिक अभयारण्यं आहेत. त्यातही काही ठराविक अभयारण्यं किंवा नॅशनल पार्क आहेत, जी तिथे आढळणाऱ्या ठराविक प्राण्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी चार ते पाच दिवसांची एक सुंदर ट्रीप नक्कीच प्लॅन करता येऊ शकते.* सुंदरबन नॅशनल पार्क
सुंदरबन हा जगातला सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश. गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात वसलेलं हे अभयारण्य इथल्या खारफुटीच्या जंगलासाठी आणि वाघांसाठी ओळखलं जातं. मॉनिटर लिझार्ड, खाडीमधल्या मगरी, आॅलिव्ह रिडले जातीची कासवं, असं बरंच काही इथं पाहण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच सुंदरबन हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीमध्ये देखील आहे. इथल्या हवामानामुळे हे पार्क वर्षभर खुलंच असतं. पण जर तुम्हाला वाघांचं आकर्षण असेल तर मात्र आॅक्टोबर ते एप्रिल हा उत्तम काळ आहे. 

Image result for * कान्हा नॅशनल पार्क

* कान्हा नॅशनल पार्क
मध्य प्रदेशामध्ये वसलेलं हे नॅशनल पार्क १९४० स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात वसलेलं आहे. साग आणि बांबूच्या वनराईमध्ये काळवीट, चिंकारा, चौसिंगा. नीलगाय, अस्वल, कोल्हे, बिबटे असे अनेकविध प्राणी पहायला मिळतात. शिवाय रूडयार्ड किपलिंगच्या 'द जंगल बुक'मागची प्रेरणा असलेलं हे जंगल. साहजिकच मोगलीच्या या जंगलातलं मुख्य आकर्षण शेर खान असणार. कान्हाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बारसिांंगाचं इथे मोठ्या कष्टानं संवर्धन केलं गेलंय. कान्हामधला सनसेट पॉइंट ही एक महत्त्वाची जागा. सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर कुरणांवर चितळं, सांबर, हरणांना चरताना पाहणं हा आनंदाचा भाग असतो. कान्हाला जाण्यासाठीचा सर्वांत योग्य काळ म्हणजे मार्च ते मे. पार्क पर्यटकांसाठी आॅक्टोबर ते जून या कालावधीतही सुरु असतं. पण पानगळ आणि उन्हामुळे जनावरांचं पाणवठ्यावर येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पर्यटकांना अधिकाधिक प्राणी पाहता येतात.* काझीरंगा अभयारण्य
काझीरंगाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील एकशिंगी गेंडा. शिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ पक्षांसाठीही काझीरंगा प्रसिद्ध आहे. सुमारे ४०० एकरांच्या परिसरात वसलेल्या या अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंड्यांची जगातली सगळ्यात जास्त संख्या आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या सान्निध्यात वसलेल्या या अभयारण्यामध्ये रानगवा, हत्ती, आॅटर, अस्वलं, बारसिंगा असे इतरही प्राणी आढळतात.  इथल्या जैवविविधतेमुळेच काझीरंगाचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीतही केला गेला आहे.

Image result for * जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

* जिम कॉर्बेट नॅशनल पार्क
१९३६ साली सुरु झालेलं हे भारतातलं पहिलं नॅशनल पार्क. वाघांच्या संरक्षणासाठी सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरचाही शुभारंभही इथूनच झाला. त्यामुळे अर्थातच इथे येणाऱ्या पर्यटकांना उत्सुकता असते ती वाघ पाहण्याची. पण त्याचबरोबर हिमालयीन अस्वलं, आॅटर, करडं मुंगूस, बिबटे, फिशिंग कॅट अशा अनेक प्रजाती आढळतात. हौशी पक्षीनिरीक्षकांसाठीही अत्यंत योग्य ठिकाण. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होऊन जूनपर्यंत हे पार्क खुले असतं. पण वाघ पाहण्यासाठी जायचं असेल तर मार्च ते मे महिन्यातच जावे. * गीर अभयारण्य
गुजरात राज्यात गेले तर गीर अभयारण्याला अवश्य भेट द्या. आशियाई सिंह आढळणारं हे भारतातलं एकमेव ठिकाणं. शिवाय इथे ३२ वेगवेगळ्या जातींचे सस्तन प्राणी, ३०० प्रकारच्या जातीचे पक्षी आढळतात. आॅक्टोबरपासून मेपर्यंत केव्हाही या अभयारण्याला भेट देता येते.

Image result for भरतपुर पक्षी अभयारण्य

* भरतपूर पक्षी अभयारण्य
केवलादेव-घाना राष्ट्रीय पक्षी उद्यान भरतपूर पक्षी अभयारण्य नावानेच प्रसिद्ध आहे. हे देशातलं सर्वांत मोठं पक्षी अभयारण्य आहे. इथे पक्ष्यांच्या ३०० हून अधिक प्रजाती आहेत. स्थलांतरित पक्षी त्यातही सायबेरियन क्रौंच आणि मध्य आशियातून येणाऱ्या प्रजाती हे इथे येणाºया पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. स्थलांतरित पक्षांचा इथे येण्याचा काळ हा मुख्यत: हिवाळा असतो. त्यामुळे आॅक्टोबरपासून इथला टूरिस्ट सीझन सुरु होतो.

Also Read : ​आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?
Web Title: Did you visit these 'National Parks'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.