स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 02:00 PM2018-09-13T14:00:53+5:302018-09-13T14:03:26+5:30

हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात.

Chilka lake bird sanctuary in Odisha | स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

googlenewsNext

साधारण ११ हजार स्क्वेअर किमी परिसरात पसरलेला चिल्का सरोवर जगातलं सर्वात मोठं समुद्री सरोवर आहे. ओडीशातील पुरी जिल्ह्यात हे सरोवर आहे. या सरोवरात अनेक छोटे छोटे सुंदर व्दीप आहेत. हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात. जर तुम्हालाही पक्षांना बघण्याची आवड असेल तर चिल्का सरोवर हे बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतं. 

सरोवराची खासियत

चिल्का सरोवरात १६० पेक्षा जास्त प्रकारचे मासे आहेत. बोटिंगसोबतच इथे फिशिंग करण्याची सुविधाही आहे. त्यासोबतच सी इगल, ग्रेलॅन गीज, पर्पल मोरहेन, फ्लेमिंगो जकाना यांच्याही प्रजाती बघायला मिळतात. पक्षांसोबतच इथे जंगली जनावरे जसे की, ब्लॅकबग, गोल्डेन जॅकाल, स्पॉटेड हरिण आणि हायना सुद्धा आहेत. 

डॉल्फिन आहे या सरोवराचं आकर्षण

चिल्का सरोवर २७ फेब्रुवारी २०१८ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर इरावदी डॉल्फिनचं सर्वात मोठं ठिकाण घोषित करण्यात आलं आहे. इथे १५५ इरावदी डॉल्फिन आढळले आहेत. यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. हिवाळ्यात इथे सर्वात जास्त पक्षी बघायला मिळतात. स्थलांतरित पक्षांसोबतच इतरही पक्षी इथे बघायला मिळतात. 

कालीजाई द्वीप

हे आयलंड देवी कालीच्या मंदिरासाठी आणि आजूबाजूच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी असते. 

सतपाड़ा

हे ठिकाणा डॉल्फिन पॉईंटच्या जवळ आहे. इथे इरावदी आणि बॉटल नोस डॉल्फिन सहजपणे बघता येतील.

कधी जावे?

तसं तर इथलं वातावरण वर्षभर चांगलं असतं त्यामुळे इथे तुम्ही कधीही जाऊ शकता. पण जास्तीत जास्त पक्षी बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यानचा काळ चांगला असतो. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - भुवनेश्वर येथील जवळील एअरपोर्ट आहे. सरोवरापासून हे जवळपास १२० किमी अंतरावर आहे. सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी येथून टॅक्सी किंवा बसेस मिळतात.

रेल्वे मार्ग - बालूगांव हे येथील जवळचं रेल्वे स्टेशन आहे. बालूंगावमधून सरोवराला पोहोचण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. 

रस्ते मार्ग - NH5 पासून चिल्का सरोवराचा एक भाग सहजपणे पाहिला जाऊ शकतो. त्यासोबतच भुवनेश्वर आणि कटकपासून ते बालूगांवपर्यंत सतत बसेस सुरु असतात. 
 

Web Title: Chilka lake bird sanctuary in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.