बंगळुरु ते पुदुच्चेरी रोड ट्रिप, नोव्हेंबर आहे परफेक्ट टायमिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:37 PM2018-11-19T15:37:26+5:302018-11-19T15:39:00+5:30

पुदुच्चेरी हे भारतातील फ्रान्सचा प्रभाव असलेलं शहर आहे. या शहरातील इमारती, पुतळे आणि घरे पाहून तुम्हाला असं वाटेल की, तुम्ही फ्रान्समध्ये फिरताय.

Bangalore to Puducherry Road Trip, November is Perfect Timing! | बंगळुरु ते पुदुच्चेरी रोड ट्रिप, नोव्हेंबर आहे परफेक्ट टायमिंग!

बंगळुरु ते पुदुच्चेरी रोड ट्रिप, नोव्हेंबर आहे परफेक्ट टायमिंग!

googlenewsNext

(Image Credit : nawangsari.sideka.id)

पुदुच्चेरी हे भारतातील फ्रान्सचा प्रभाव असलेलं शहर आहे. या शहरातील इमारती, पुतळे आणि घरे पाहून तुम्हाला असं वाटेल की, तुम्ही फ्रान्समध्ये फिरताय. व्यापारापासून ते युद्ध या सगळ्यासाठी पुदुच्चेरी हे शहर खास आहे. तुम्ही जर शांतता हवं असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. इथे फिरण्यासाठीही खूप ठिकाणे आहेत. पण जर तुम्ही पुदुच्चेरीची रोड ट्रिप केली तर तुम्हाला अधिक जास्त आनंद मिळेल. 

कधी जाल?

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुदुच्चेरी फिरायला जाण्याचा विचार चुकीचा ठरेल. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च इथे जाण्यासाठी खास कालावधी ठरेल. या दिवसांमध्ये येथील वातावरण फारच मनोहारी असतं. अशात शहरातील प्रत्येक ठिकाणाला एन्जॉय करु शकाल. तसं पावसाळ्यातही तुम्ही इथे येऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. 

कसे जाल?

बंगळुरु ते पुदुच्चेरी हे अंतर ३२० किमी इतकं आहे. म्हणजे साधारण ६ ते ७ तासांचा प्रवास. रोड ट्रिपसाठी तुमच्या कार सोबतच तुम्ही टॅक्सी आणि कॅबही बुक करु शकता. कॅब किंवा टॅक्सी चांगली राहिल कारण यात तुम्हाला ड्रायविंगचं टेन्शन राहणार नाही आणि तुम्ही प्रवास एन्जॉय करु शकाल.

पुदुच्चेरी जाण्यासाठी मार्ग

बंगळुरुहून पुदुच्चेरीला जाण्यासाठी तीन पर्याय आहेत. हे तिन्ही रस्ते तुमचा प्रवास सुखकारक आणि मजेदार करतील. 

मार्ग - १

तिरुवन्नामलाई मार्गे
बंगळुरु-होसूर-कृष्णागिरी-चेनगम-तिरुवन्नामलाई-टिंडीवनम-पुदुच्चेरी

हा सर्वात कमी अंतर असलेला मार्द आहे. यात तुम्ही NH77 ने प्रवास करत पुदुच्चेरीचा प्रवास ६ ते ७ तासात पूर्ण करु शकता. जर तुम्ही रस्त्यात लागणाऱ्या नजाऱ्यांचा आनंद घेत प्रवास कराल तर थोडा जास्तही वेळ लागू शकतो. 

कुठे घेऊ शकता ब्रेक?

चंदीरा चूडेश्वरर मंदिर
कृष्णागिरी डॅम
कृष्णागिरी फोर्ट
श्री रामना आश्रम
अरूणाचलेश्वर मंदिर
जिंजी फोर्ट

मार्ग - २

वेल्लोर-अरकोट मार्गे
बंगळुरु-होसूर-अंबुर-वेल्लोर-अरकोट-तिंदीवनम-पुदुच्चेरी

पुदुच्चेरी जाण्यासाठी हा सर्वात सुंदर रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही सुंदर नजारे बघू शकता. NH48 मार्गाने तुम्ही ३८० किमीचा प्रवास तुम्ही ७ तासांमध्ये पूर्ण करु शकता. 

कुठे घेऊ शकता ब्रेक?

जवाधू हिल्स
वेल्लोर फोर्ट
पालमथी हिल्स

मार्ग - ३

चित्तूर-महाबलीपुरम मार्ग
बंगळुरु-होसकोटे-कोलार-चित्तूर-कांचीपुरम-महाबलीपुरम-पुदुच्चेरी

बंगळुरुहून पुदुच्चेरी जाण्यासाठी तुम्हाला NH75 आणि NH206 या हायवेने जावे लागेल. ४४० किमीचा हा प्रवास तुम्ही ९ तासांमध्ये पूर्ण करु शकता.

कुठे घेऊ शकता ब्रेक?

काइगल फॉल्स
एकमबरेश्वर मंदिर
महाबलिपुरम गुहा

Web Title: Bangalore to Puducherry Road Trip, November is Perfect Timing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन