फॅशन फ्रीक असाल तर या फॅशनेबल सीटी कधीतरी पाहायलाच हव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:25 PM2017-11-06T18:25:43+5:302017-11-06T18:32:57+5:30

कला, संस्कृती, आरोग्य यासोबतच फॅशन हा ही पर्यटनातला एक नवा ट्रेण्ड आहे. कुठे काय फॅशन आहे हे बघण्यासाठीही पर्यटन केलं जातं. अर्थात यासाठी जगाच्या पाठीवर निवडक देश आणि शहरं आहेत. ती फिरली की फॅशनच्या जगात कोणता ट्रेण्ड आहे हे सहज कळतं.

Are You fashion freek? Then plan to see these fashionable cities in world | फॅशन फ्रीक असाल तर या फॅशनेबल सीटी कधीतरी पाहायलाच हव्यात!

फॅशन फ्रीक असाल तर या फॅशनेबल सीटी कधीतरी पाहायलाच हव्यात!

Next
ठळक मुद्दे* जगातल्या फॅशनेबल शहरांच्या यादीत न्यूयॉर्कचं नाव आघाडीवर आहे. वेगवेगळ्या तहेच्या लुकसाठी      लागणा-याट्रेण्डी कपड्यांच्या व्हरायटी तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये नक्की पाहायला मिळतील.* फॅशनच्या बाबतीत पॅरिसच्या बरोबरीनं ज्या शहराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे मिलान. न्यूयॉर्क, पॅरिस फॅशन वीकप्रमाणे मिलान फॅशन वीकही जगप्रसिद्ध आहे. या फॅशन वीकमधून फॅशनचे नवनवीन ट्रेण्ड सेट होतात.* फॅशनची पंढरी जर पॅरिस असेल तर लंडनला आळंदी म्हणायला नक्कीच हरकत नाही. स्ट्रीट फॅशनपासून स्टुडिओ फॅशनपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशन तुम्हाला लंडनमध्ये पाहायला मिळतात.

- अमृता कदम

आपल्याकडे फॅशन म्हटलं की बॉलिवूड हेच समीकरण पक्कं आहे. पण जगात अशी अनेक शहरं आहेत जी फॅशनचा ट्रेण्ड सेट करत असतात. खरंतर हल्ली पर्यटन म्हणजे फक्त फिरण्याचा आनंद घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेलं नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी पर्यटन केलं जातं. कला, संस्कृती, आरोग्य यासोबतच फॅशन हा ही पर्यटनातला एक नवा ट्रेण्ड आहे. कुठे काय फॅशन आहे हे बघण्यासाठीही पर्यटन केलं जातं. अर्थात यासाठी जगाच्या पाठीवर निवडक देश आणि शहरं आहेत. ती फिरली की फॅशनच्या जगात कोणता ट्रेण्ड आहे हे सहज कळतं. त्यामुळं तुम्हीही जर फॅशन फ्रीक असाल, फॅशनच्या दुनियेत काय काय सुरु आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर जगातल्या ‘मोस्ट फॅशनेबल’ शहरांना भेट द्यायलाच हवी.

1. न्यूयॉर्क

इथली फॅशन पहायची असेल तर तुम्हाला रॅम्पवर चालणा-या मॉडेल्स पाहण्याची गरज नाहीये. रस्त्यांवरु न फिरणा-या लोकांकडे नजर टाकलीत तरी तुम्हाला कळेल की हे लोक फॅशनच्या बाबतीत किती सजग आहेत. त्यामुळेच जगातल्या फॅशनेबल शहरांच्या यादीत न्यूयॉर्कचं नाव आघाडीवर आहे. वेगवेगळ्या त-हेच्या लुकसाठी लागणा-या ट्रेण्डी कपड्यांच्या व्हरायटी तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये नक्की पाहायला मिळतील.

 

2. पॅरिस

कला, स्थापत्य, साहित्य यासोबतच पॅरिस प्रसिद्ध आहे इथल्या फॅशनसाठी. केवळ आजच नाही तर अगदी ऐतिहासिक काळापासून पॅरिस फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. अनेक नामांकित क्लोदिंग आणि अक्सेसरीचे ब्रॅण्ड पॅरिसमधलेच आहेत. त्यामुळेच फॅशनच्या दुनियेत पॅरिसची फॅशन कधीच आउटडेटेड होत नाही. पॅरिस फॅशन वीकमध्ये आपला सहभाग नोंदवणं हे फॅशन डिझायनर्ससाठी स्वप्नवत आणि अभिमानास्पद असतं.

3. मिलान

फॅशनच्या बाबतीत पॅरिसच्या बरोबरीनं ज्या शहराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे मिलान. न्यूयॉर्क, पॅरिस फॅशन वीकप्रमाणे मिलान फॅशन वीकही जगप्रसिद्ध आहे. या फॅशन वीकमधून फॅशनचे नवनवीन ट्रेण्ड सेट होतात. मिलानमधली फॅशन महिन्यांच्या नाही तर अगदी दिवसांच्या हिशोबात बदलत राहाते. मिलानमधल्या फॅशन इन्स्ट्यिूटही प्रसिध्द आहेत.

 

4. टोक्यो

जपान त्याच्या पारंपरिकतेसाठी ओळखला जात असला तरी फॅशनच्याबाबतीतही अग्रेसर आहे. पारंपरिक आणि नवतेचा संगम साधत इथली फॅशन बहरली आहे. सध्या चलतीत असलेल्या क्रॉप टॉप्सचा उगमही टोक्योमधूनच झाला आहे. त्यामुळे नवनवीन फॅशन्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर टोक्योला आवर्जून भेट द्यायला हवी.

5. लंडन

फॅशनची पंढरी जर पॅरिस असेल तर लंडनला आळंदी म्हणायला नक्कीच हरकत नाही. स्ट्रीट फॅशनपासून स्टुडिओ फॅशनपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशन तुम्हाला लंडनमध्ये पाहायला मिळतात. इथल्या एका व्यक्तीनं केलेली फॅशन ही दुस-या व्यक्तीसारखी अजिबातच नसते.

 



6. रोम

मिलानबरोबरच इटलीची राजधानी रोमही फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. इथली फॅशन जगभरातले लोक बिनदिक्कतपणे फॉलो करतात. इथे सर्वचजण फॅशनचे जाणकार आहेत. रोम मध्ययुगीन स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर फॅशनच्या दुनियेतही रोमचं नाव आदरानं घेतलं जातं. इतिहासाबरोबरच सध्या फॅशनच्या दुनियेत काय चाललंय हे माहित करून घ्यायचं असेल तर रोमची वारी एकदा तरी करायला हवी.

 

7. नैरोबी

केनिया या आफ्रिकेतल्या देशाची ही राजधानी. हे नाव वाचून तुम्हाला कदाचित आपली काहीतरी गफलत होतीये असं वाटू शकतं. पण फॅशनच्या दुनियेत या शहराचं नाव आघाडीवर आहे. जगातले अनेक आघाडीचे फॅशन डिझायनर नैरोबीचे आहेत. नैरोबी केवळ स्टुडिओ फॅशनसाठीच प्रसिद्ध नाहीये तर इथली स्ट्रीट फॅशनही पर्यटकांना आकर्षून घेते. नैरोबीमध्ये वर्षातून एकदा फॅशन मार्केटही लागतं ज्यामध्ये वेगवेगळे डिझायनर्स आपलं कलेक्शन सादर करतात. तुम्ही केनियन वाइल्ड लाइफ सफारीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. पण केनियामध्ये गेल्यावर केवळ जंगलाचं सौंदर्य न पाहता थोडीशी जिवाची चैन आणि फॅशनही नक्की करु न पहा.

8. स्टॉकहोम

स्वीडनची राजधानी स्टॉकहोमसुद्धा फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. लंडन, पॅरिसप्रमाणे स्टॉकहोमचा फॅशन सेन्सही वाखाणला जातो. त्यामुळं इथं फिरतानाही फॅशनचे नवनवे ट्रेण्ड तुम्हाला नक्की पाहायला मिळतील.

 

 

Web Title: Are You fashion freek? Then plan to see these fashionable cities in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.