उन्हाळ्यात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नंदी हिल्स ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:10 PM2019-05-09T13:10:29+5:302019-05-09T13:18:02+5:30

इथे तुम्ही पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, बायकिंग, हिस्टोरिक वॉक आमि नेचर वॉकचा मनमुराद आनंद घेऊ शकता. कपल टूर आणि फॅमिली अशा दोन्ही दृष्टीने हे एक परफेक्ट टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. 

Adventure activities to do In Nandi Hill | उन्हाळ्यात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नंदी हिल्स ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

उन्हाळ्यात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नंदी हिल्स ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

Next

(Image Credit : Trans India Travels)

कर्नाटक राज्यातील नंदी हिल्स हे पर्यटकांचं पसंतीचं ठिकाण आहे. हे ठिकाण खासकरून त्या पर्यटकांना अधिक आवडतं, ज्यांना अ‍ॅडव्हेंचर टुरिज्मची आवड आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, बायकिंग, हिस्टोरिक वॉक आणि नेचर वॉकचा मनमुराद आनंद घेऊ शकता. कपल टूर आणि फॅमिली अशा दोन्ही दृष्टीने हे एक परफेक्ट टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. 

नंदी हिल्स कर्नाटकातील चिकबलपूर जिल्ह्यात स्थित आहे. चिकबलपूरपासून हे ठिकाण केवळ १० किमी अंतरावर आहे. तर भारतातील आयटी हब असलेल्या बंगळुरूपासून हे ठिकाण साधारण ४५ किमी अंतरावर आहे. बंगळुरू आणि चिकबलपूर दोन्हीही ठिकाणांहून सहजपणे सार्वजनिक वाहनांनी तुम्ही नंदी हिल्सला पोहोचू शकता. 

कमी असते गर्दी

(Image Credit : TravelTriangle)

अ‍ॅडव्हेंचर्स लव्हर्ससाठी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नंदी हिल्स एक परफेक्ट ठिकाण ठरू शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे गर्दी फार कमी असते. तुम्ही इथे चेनागिरी आणि स्कंदगिरीच्या ट्रेकिंगवर मजा करू शकता. नंदी हिल्सची सुंदरता आणि आकर्षणाला पॅराग्लायडिंगने आणखी चांगलं बघू शकता. तसेच अमृता सरोवरावर वेळ घालवणंही वेगळा अनुभव ठरू शकतो. 

नंदी हिल्सचा इतिहास

(Image Credit : Maunewsonline - UiTV)

नंदी हिल्सला नंदी दुर्गही म्हटलं जातं. टीपू सुल्तान हा उन्हाळ्यात याच ठिकाणी येऊ राहत होता. नंदी हिल्सच्या आजूबाजूला काही जुन्या इमारती आणि रस्ते आहेत. त्यातून येथील समृद्ध इतिहास कळून येतो. 

या गोष्टींची लक्षात ठेवा

(Image Credit : YouTube)

- जर तुम्ही नंदी हिल्सला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे लक्षात ठेवा की, तुम्हाला खाण्या-पिण्याच्या वस्तू खालूनच सोबत घ्याव्या लागतील. असं नाही की, वर काहीच मिळणार नाही, पण जे मिळेल ते तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या आवडीनुसारच मिळेल असं नाही. 

- नंदी हिल्स इतर टूरिस्ट स्टेशनप्रमाणे फार विकसित झालं नाहीये. याचे काही नुकसान आहेत तर काही फायदे आहेत. इथे प्रदूषण नाही. मोकळेपणाने श्वास घेणे आणि मोकळेपणाने आऊटडोअर गेम खेळण्याचा आनंद इथे घेऊ शकता. 

Web Title: Adventure activities to do In Nandi Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.