'The actor has taken a ride from the seventh biking to the seven countries! | ​‘या’ अभिनेत्याने चक्क बाईकवरून केली सात देशांची सफर !

सामान्य व्यक्तींप्रमाणेच बहुतेक सेलिब्रिटींना अभिनयाव्यतिरिक्त काहीना काही छंद, आवड जोपासण्याची सवय आहे. त्यात सेल्फी काढण्यापासून ते बाईक्स कलेक्शनपर्यंतचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांचा छंद त्यांच्या  जीवनशैला एक भाग आहे. आपल्या व्यस्त लाइफमध्ये ते आपला छंद पुर्ण करण्यासाठी कधीही तडजोड करत नाही. छंद जोपासणाऱ्या सेलिब्रिटींपैकी बॉलिवूडमध्ये नव्यानेच पदार्पण करणाऱ्या मनित जौरा या अभिनेत्याचा शौक थोडा वेगळाच आहे. अर्थात त्याला अ‍ॅडव्हेंचरची आवड आहे पण तीदेखील एकदम हटके.
मनित जौराला मोटर सायकल चालवण्याचे वेड आहे. विशेष म्हणजे या छंदापोटी जगातील सात देशामध्ये त्याने बाईक रायडिंग केले आहे. असे म्हटले जाते की, तो जर अभिनेता झाला नसता तर तो बाईकर्स झाला असता.
मनित बॉलिवूडच्या 'बँड बाजा बारात', 'लव्ह शगून' यासारख्या चित्रपटात झळकला आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात टीव्ही मालिकांपासून झाली. तो सध्या 'कुंडली भाग्य' या मालिकेत काम करीत आहे.
सध्या मनितवर साऊथ इंडियन निर्मात्यांचे लक्ष गेले आहे. तो मल्याळम चित्रपट 'सोलो'मध्ये भूमिका साकारतोय. हा एक रोमँटिक थ्रिलर आहे. यात तो दक्षिणेचा सुपरस्टार दुलकर सलमानसोबत काम करतो आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. मनित खाण्याचादेखील शौकिन आहे. त्याला राजमा चावल आवडत असल्याचे मुलाखतीत सांगितले.
मनित इरफान खानचा चाहता आहे. त्याला इरफानसोबत काम करायचे आहे. तसेच त्याला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतही काम करण्याची इच्छा आहे. त्याने दोघांच्याही अभिनयाची तारीफ केली. 
Web Title: 'The actor has taken a ride from the seventh biking to the seven countries!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.