उन्हाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे 7 समुद्र किनारे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 11:25 AM2018-04-14T11:25:40+5:302018-04-14T11:25:40+5:30

जर तुम्ही या उन्हाळ्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी समुद्र किना-यावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्याय सांगणार आहोत.

7 Indian Beaches You Need To Visit This Summer | उन्हाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे 7 समुद्र किनारे

उन्हाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे 7 समुद्र किनारे

Next

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्यासाठी चांगल्या ठिकाणांचा शोध घेण्यात लागणारा वेळ सर्वांसाठीच डोकेदु:खीची गोष्ट आहे. अनेकदा फिरायला जाण्याचे ठरले तरी, नेमकं कुठं जायचं ते ठिकाणंच ठरलेलं नसतं. पण जर तुम्ही या उन्हाळ्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी समुद्र किना-यावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्याय सांगणार आहोत. इथे जाऊन तुम्हाला नक्कीच सुट्टीचा मनमुराद आनंद लुटता येईल.

1) गणपतीपुळे, रत्नागिरी

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. 

2) हॅवलॉक, अंदमान

अंदमानमधील हॅवलॉक बीचला कालापत्थर बीच (तट) असेही म्हटले जाते. येथील सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षिक करतो.

3) पॅलोलियम बीच, गोवा

गोव्यात तसे अनेक बीच आहेत. पण त्यातील काही बीच हे खास आहेत. त्यातीलच एक म्हणजे पॅलोलियम बीच. शॉपिंग, म्युझिक आणि समुद्राचा पुरेपुर आनंद तुम्हाला इथे घेता येईल.

4) कोव्हलम बीच, केरळ

कुटुंबियांसोबत जाण्यासाठी हे ठिकाण सर्वात चांगला पर्याय आहे. 

5) कोट्टकुप्पम, पॉंडेचेरी

पॉंडेचेरीतील हा बीच पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहीलाय. इथे तुम्हाला स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टचाही आनंद घेता येईल.

6) मरिना बीच, चेन्नई

हा जगातील दुसरा सर्वात मोठा बीच आहे. सुंदर समुद्रासोबतच इथे तुम्हाला आणखीही काही सुंदर ठिकाणे बघायला मिळतील. 

7) गोकर्णा, कर्नाटक

इथे तुम्हाला समुद्रात वेगवेगळ्या राईड्चा आनंद लुटता येईल. तसेच 
 

Web Title: 7 Indian Beaches You Need To Visit This Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास