पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 03:26 PM2018-05-15T15:26:14+5:302018-05-15T15:26:14+5:30

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंद असतो. पण या आनंदात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. चला जाणून घेऊया पहिल्यांदा विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

5 things to do when you are flying for the first time in flight in Marathi | पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी!

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी!

उन्हाळ्यात अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परीवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. कुणी आपल्या शहराच्या आजूबाजूला जाऊन एन्जॉय करतात तर काही दूर जातात. अनेकजण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचाही प्लॅन करतात. पण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्यांची वेळेवर वेगवेगळ्या कारणांनी पंचाईत होत असते. पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंद असतो. पण या आनंदात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. चला जाणून घेऊया पहिल्यांदा विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

दोन तास आधी एअरपोर्टला पोहोचा

जर तुम्ही पहिल्यांदाच विमान प्रवास करत असाल तर तुम्ही एअरपोर्टवर कमीत कमी 2 तास आधी पोहोचणे गरजेचे आहे. याचं कारण म्हणजे एअरपोर्टवरील सर्वच प्रोसेस फार वेळखाऊ असतात. त्या पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आधीच तेथे पोहोचल्यास अधिक चांगले. 

आयडी प्रूफ आणि तिकीटाची फोटोकॉपी

पहिल्यांदाच विमान प्रवास करणार असाल तर तुमटं तिकीट आणि ओळखपत्राची फोटोकॉपी अवश्य ठेवा. जर तुम्ही तुमच्या परीवारासोबत आणि मुलांसोबत प्रवास करत असाल तर त्यांचा जन्माचा दाखला आणि परीवारातील सदस्यांचे ओळखपत्र सोबत ठेवा. 

एअरलाईनच्या हिशोबाने ठेवा बॅग

एअरलाईन्सचे आपले वेगळे नियम असतात. त्यानुसार काही नियोजित वजनाचे बॅग तुम्ही विमानात घेऊन जाऊ शकता. त्यामुळे नियमानुसार बॅगेचं वजन ठेवा, अन्यथा तुम्हाला जास्त वजनासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यासोबतच बॅगमध्ये टोकदार वस्तू, चाकू, लायटर, माचिस किंवा ब्लेड सारख्या वस्तू ठेवू नका.

सिक्युरिटी चेकींगला द्या प्रतिसाद

तुम्हाला चेकींग काऊंटरवर बोर्डिंग पास आणि आयकार्ड दाखवावं लागेल. नंतर सिक्युरिटी फोर्स मेंबर्स तुमचं चेकींग करणार आणि बोर्डिंग पासवर स्टॅम्प तुम्हाला परत देतील. यात उगाच दिरंगाई करु नका. त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलेल्या गेटकडे जावं लागेल. तुमचा फ्लाईट नंबर आणि सीट नंबरही तुम्हाला दिला जाईल.  

सीट बेल्ट आणि इतर माहिती नीट ऐका

टेकऑफच्या एक तासांपूर्वी टर्मिनलचं गेट उघडलं जाईल. इथे पुन्हा एकदा बोर्डिंग पास आणि हॅंडबॅग चेक करावं लागेल. प्लेनमध्ये एन्ट्री केल्यानंतर सर्वातआधी क्रू मेंबर्स तुम्हाला काही सूचना देतील. त्या फॉलो करा.
 

Web Title: 5 things to do when you are flying for the first time in flight in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.