मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:34 PM2019-06-27T12:34:50+5:302019-06-27T12:35:02+5:30

मान्सूनच्या तयारीसाठी प्रत्येकजण काहीना काही प्लॅनिंग करत आहेत. कुणी पहिल्या पावसात भिजण्याचा वाट बघत आहेत तर कुणी रिमझिम पावसात चहा-पकोडे खाण्याची वाट बघत आहेत.

5 offbeat places to visit in Monsoon | मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे! 

मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे! 

Next

मान्सूनच्या तयारीसाठी प्रत्येकजण काहीना काही प्लॅनिंग करत आहेत. कुणी पहिल्या पावसात भिजण्याचा वाट बघत आहेत तर कुणी रिमझिम पावसात चहा-पकोडे खाण्याची वाट बघत आहेत. पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्यांची देखील मोठी संख्या आहे. पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी आम्ही काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. इथे मान्सूनमध्ये जणू स्वर्गाचा अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो.

बिलासपुर, हिमाचल प्रदेश

जेव्हा हिमाचल प्रदेशच्या बिलासपुरचा विषय निघतो तेव्हा भाखडा नंदल डॅमचा विषय निघतोच. या डॅमच्या वरून गोविंद सागर तलावाच्या दृश्याची कल्पना करूनच मनात आनंदाच्या लहरी येऊ लागतात. जर तुम्ही या दिवसात इथे जाल तर तुम्हाला एक वेगळा आणि आनंद देणारा अनुभव मिळेल. दिल्लीपासून हे ठिकाण ३८० किलोमीटर अंतरावर आहे.

बुंदू, राजस्थान

(Image Credit : indianholiday.com)

जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की, राजस्थान केवळ वाळवंट आणि किल्ल्यांचं ठिकाण आहे. तर मान्सून तुम्ही ही धारणा दूर करण्यासाठी परफेक्ट कालावधी असेल. या दिवसात होणाऱ्या रिमझिम पावसात राजस्थानच्या बूंदीची सैर करा. तारागढ किल्ल्याहून जेव्हा तुम्ही शहर आणि तलावांना बघाल तर वाह...असं तुमच्या तोंडून निघेल. दिल्लीपासून या ठिकाणाचं अंतर साधारण ४७३ किमी आहे. 

ओरछा, मध्यप्रदेश

(Image Credit : travel.paintedstork.com)

मान्सूनचा आनंदही घ्यायचाय आणि शांतताही हवी असेल तर तुमच्या ओरछा पेक्षा दुसरं चांगलं ठिकाण असू शकत नाही.  इथे बेतवा नदीच्या किनाऱ्यावर बसून तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. किल्ल्यांची भव्यता बघू शकता आणि प्राचीन मंदिरांची सैरही करू शकता. 

मतियाना, हिमाचल प्रदेश

(Image Credit : Tripoto)

निसर्गाच्या कुशीत वसलेले हे एक छोटं गाव आहे मतियाना. हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. जे पावसाळ्यात अधिक सुंदर आणि मनमोहक दिसतं. बर्फाने झाकला गेलेला हिमालय आणि दाट धुकं एक वेगळाच आनंद मिळवून देतं. गावातील कोणत्याही डोंगरावर उभं राहून खाली बघितलं तर तुम्ही आकाशात असल्याची जाणीव तुम्हाला होते. 

रूपनगर, पंजाब

(Image Credit :Wikipedia)

पंजाबचं रूपनगर शहर सतलज नदीच्या किनाऱ्यावर वसलं आहे. या नदीचा किनारा या ठिकाणाची सुंदरता अधिक वाढवतो. तसेच इथे तुम्ही सिंधू घाटाची संस्कृती बघू शकता. दिल्लीपासून हे ठिकाण २२० किमी अंतरावर आहे.

Web Title: 5 offbeat places to visit in Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.